शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
2
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
4
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
5
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
6
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
7
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
8
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
9
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
10
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 
11
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
12
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
13
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
14
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
15
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
16
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
17
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
18
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
19
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
20
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात राजेश लाटकर गाठीभेटीत व्यस्त, वसंतराव मुळीक जरांगेंच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 12:31 IST

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतरही ती ऐनवेळी बदलली गेलेल्या राजेश लाटकर यांनी सदरबाजार, विचारेमाळ परिसरातील ...

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतरही ती ऐनवेळी बदलली गेलेल्या राजेश लाटकर यांनी सदरबाजार, विचारेमाळ परिसरातील नागरिकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. उमेदवारी नाकारलेले वसंतराव मुळीक मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे भेटीस आंतरवाली सराटी येथे गेले आहेत. रात्री उशिरा जरांगे - मुळीक यांची भेट झाली. चर्चेचा तपशील मात्र समजला नाही.नाराज झालेल्या लाटकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी, जरी लाटकर नाराज झाले असले तरी त्यांची समजूत काढली जाईल, त्यांना बेदखल करून आम्ही पुढे जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. दोन दिवसात आमदार पाटील व खासदार शाहू छत्रपती हे लाटकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, लाटकर यांना, त्यांच्या घरी सदरबाजार, विचारेमाळ येथील नागरिक भेटायला जात आहेत. त्यांच्याशी चर्चा करत आहेत. ऐनवेळी उमेदवारी बदलल्यामुळे लाटकर यांना सहानुभूती मिळत आहे.काँग्रेसकडून उमेदवारी मागितलेले वसंतराव मुळीक मराठायोद्धा मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आंतरवाली सराटी येथे गेले आहेत. जरांगे पाटील यांनी विधानसभा लढविण्याबाबत दिलेल्या सूचना तसेच कोल्हापुरातील दहा विधानसभा जागांबाबत या भेटीत चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, उदय देसाई, विजय पाटील, प्रताप नाईक, अवधूत पाटील हेदेखील गेले आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024