कोल्हापूर : ‘सखी मंच’च्या व्यासपीठावर नेहमीच महिलांच्या कलागुणांना वाव दिला जातो आणि सखी त्याचा लाभही घेत असतात; म्हणूनच महिला दिनाचे औचित्य साधून ‘सखी सम्राज्ञी २०२०’ या कार्यक्रमाचे रविवारी (दि. ८) डीवायपी सिटी येथे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डीवायपी मॉल अँड हॉस्पिटॅलिटीचे सी. ई. ओ. सिद्धार्थ साळोखे आणि डीवायपी ग्रुपच्या एच. आर. हेड श्रीलेखा साटम उपस्थित होत्या. परीक्षक डॉ. इरफाना शेख-पाटील, डॉ. अनुराधा साळुंखे आणि तृप्ती कामटे-पवार, डीजे अन्नी ऊर्फ शिवानी कदम उपस्थित होते.‘सखी सम्राज्ञी २०२०’साठी २०हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. ऐश्वर्या पोवार हिच्या बहारदार निवेदनाने कार्यक्रमात रंगात आणली. यामध्ये प्रत्येक स्पर्धकाने ेवेगवेगळ्या ढंगात आपली ओळख सादर करून पहिली ‘अशी मी’ ही फेरी पूर्ण केली. त्यानंतर कलाविष्कार फेरीमध्ये ‘सखीं’नी आपल्यातील कलागुणांना व्यासपीठावर सादर केले.
यामध्ये नृत्य, गायन, टेरोकार्ड, एकपात्री अशा कला पाहायला मिळाला. या फेरीमध्ये सगळ्या सखींनी प्रेक्षकांची मने जिंकली. शेवटची फेरी प्रश्नोत्तरांची होती. ज्यामध्ये परीक्षकानी विचारलेल्या प्रश्नांना स्पर्धकांनी हुशारीने उत्तरे दिली आणि आपली मते मांडली.अशा पद्धतींने या तीनही फेऱ्या पार करून ‘सखी सम्राज्ञी २०२०’ची निवड करण्यात आली. राजेश्वरी मोटे ‘सखी सम्राज्ञी २०२०,’ तर प्रथम आणि द्वितीय उत्तेजनार्थ अनुक्रमे वर्षा जोशी आणि शीतल गायकवाड यांनी मिळविला.परीक्षक म्हणून डॉ. इरफाना शेख-पाटील, डॉ. अनुराधा साळुंखे आणि तृप्ती कामटे-पवार यांनी परीक्षणाचे काम केले.
विजेत्या स्पर्धकांना स्टर्र्लिंग हॉलिडे यांच्याकडून गिफ्ट व्हाउचर, व्होयला ज्वेलरी यांच्याकडून आकर्षक ज्वेलरी सेट, सॅश आणि मुकुट देण्यात आला. या कार्यक्रमासाठी डीवायपी सिटी यांचे सहकार्य मिळाले. हॉलिडे पार्टनर स्टर्लिंग हॉलिडे, प्राईझ पार्टनर व्होयला आणि सपोर्टिंग पार्टनर शॉपर्स स्टॉप हे होते.महिला दिनानिमित्त विशेष सादरीकरणके युनिट डान्स ग्रुपच्या कलाकारांनी महिला दिनानिमित्त यावेळी नृत्याविष्कार सादर केला. यामध्ये स्त्रीसन्मान आणि स्त्रीशक्तीचे सादरीकरण करण्यात आले आणि सादरकर्त्याही सर्व महिलाच होत्या. त्यांच्या नृत्यातून स्त्रीशक्तीला सलाम केला.डीजेच्या तालावर सखी थिरकल्याखास महिला दिनाचे औचित्य साधून नवीन क्षेत्रातील महिलांनाही आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये नव्याने येऊ घातलेल्या डीजे क्षेत्रातील शिवानी कदम म्हणजेच डीजे अन्नी यांना बोलावले होते. कार्यक्रमादरम्यान त्यांच्या सादरीकरणाने सखींना संगीताच्या तालावर नाचायला भाग पडले.मेकअप डेमोआपण सुंदर दिसावं असं प्रत्येकीलाच वाटत असतं आणि यासाठी हलकासा मेकअप असेल तर आपल्या सौंदर्यात भरच पडते; म्हणूनच अनुराधा पित्रे यांनी कार्यक्रमादरम्यान काही ब्यूटी टिप्स दिल्या. सोबतच मेकअप डेमो दाखविला.