शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बहुजन समाजात एकरूप झालेले ‘राजपूत’

By admin | Published: June 08, 2015 12:08 AM

ऐतिहासिक वारसा : हल्दीघाटी लढाईनंतर कोल्हापुरात स्थायिक , जिल्ह्यात ३५ हजारांहून अधिक लोकसंख्या--लोकमतसंगेजाणून घेऊ-- राजपूत समाज

सचिन भोसले - कोल्हापूर --राजपुतांना जन्मत:च योद्धा म्हटले जाते, अशा ‘क्षत्रिय राजपूत’ समाजाची काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत एकेकाळी सत्ता होती. ब्रिटिश काळ सोडला, तर या समाजाने अनादिकालापासून भारतावर राज्य केले आहे. या क्षत्रिय कुलावंतात हरिश्चंद्र, विश्वामित्र, राम, श्रीकृष्ण, राजा दशरथ, सम्राट पृथ्वीराज चौहान, मानसिंह कछवाह, जसवंतसिंह राठोड, रायसिंह-कर्णसिंह, राणा प्रताप, चंद्रसेन, सुस्त्रान, महाराणा प्रताप... एवढेच काय, छत्रपती शिवाजी महाराज, अशा महान विभूतींचा जन्म या क्षत्रिय कुलात झाला. अशा या समाजाने स्वातंत्र्यानंतर बहुजन समाजात मिसळून आधुनिकतेची कास धरली आहे. २१ जून १५७६ रोजी अकबर व महाराणा प्रताप यांच्यात हल्दीघाटची लढाई झाली. या लढाईनंतर क्षत्रिय राजपूत समाजातील लोक भारतातील विविध प्रांतांत विखुरले गेले. यांतील अनेक लोक सातपुडा पर्वतरांगांमध्ये आपला उदरनिर्वाह करण्यासाठी वास्तव्यास आले. शिवाजी महाराज यांच्या कार्यकालात तर अकबर, औरंगजेबाच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात राजपूत सैनिक होते. महाराष्ट्रातील विविध लढायांनिमित्त हे राजपूत राज्यातील जंगलांत राहू लागले. पुढे ते येथेच राहिले. १८५७ साली ब्रिटिशांविरोधात उठाव झाला. यामध्ये अग्रदूत वीर कुॅँवरसिंह यांनी उत्तुंग कामगिरी केली. या उठावानंतर अनेक राजपूत कोल्हापूर जिल्ह्यात आले. १८९५ साली शाहू महाराज हे शिकारीनिमित्त सोनतळी येथे जात असताना त्यांनी आपल्या शेतात एक पहार मारली व ती वाकवून ठेवली. पुन्हा सायंकाळी ते शेतात आले असता ती पहार सरळ केली होती. हे ताकदीचे काम कोणी केले असे महाराजांनी सर्वांना विचारले. तेव्हा मंगलसिंग राजपूत यांचे नाव पुढे आले. याच दरम्यान भोला पंजाबी कुस्ती करण्यासाठी आला होता. तो महाराजांना ‘माझी कुस्तीची लढत ठरवा, अन्यथा मला खंडणी द्या,’ असे म्हणाला. त्यावर महाराजांनी मंगलसिंग राजपूत यांना सोनतळी येथून बोलावून घेतले. मंगलसिंग व भोला पंजाबीसमोर महाराजांनी एक टोपली ओले वरणे व शेरभर तूप ठेवले. महाराजांनी समोर टाकलेले वरणे हाताला तूप लावून काही मिनिटांतच मंगलसिंग यांनी सोलले. हे काम पाहून भोला पंजाबी हे हादरून गेले. त्यांनी आपल्यापेक्षा थोर पैलवान महाराजांकडे आहे, आपली माघार म्हणून महाराजांकडे निशाण फडकावले. महाराजांनी भोलाला आतापर्यंत विविध ठिकाणांहून आणलेली खंडणीतील वाटणी मंगलसिंग यांना देण्यास सांगितले. याचबरोबर मंगलसिंग यांना १४ एकर जागा सोनतळीजवळ दिली. हीच आताची रजपूतवाडी होय. या मंगलसिंग यांच्या वंशजांबरोबर त्या काळी कोल्हापूरच्या जवळपासच्या क्षेत्रात अनेक राजपूत कुटुंबे आली होती. त्यानुसार स्वातंत्र्यानंतर सध्याच्या घडीला महाराष्ट्रात राजपूत समाजाची ५६ लाख तर, जिल्ह्यात ३५ हजार इतकी लोकसंख्या आहे. स्वातंत्र्यानंतर कोल्हापुरातील राजपूत समाजाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. या समाजाला स्वत:चे असे कार्यालयही नाही. वारंवार शासनदरबारी विनंती अर्ज करूनही या समाजासाठी कोठेही अद्याप जागा मिळालेली नाही. या समाजाची कास बहुजन समाजाबरोबर बांधली असल्याने जातपात न पाहता अडल्या-नडलेल्या नागरिकांना यथाशक्ती मदतीचा हात नियमित दिला जात आहे. या समाजाला शासनदरबारी केवळ तीन टक्के आरक्षण आहे. याचबरोबर जातीचे दाखले मिळताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे शासनाने अल्पसंख्याक असणाऱ्या या समाजाला इतर समाजाबरोबरीने नोकरी, शिक्षणातही आरक्षण द्यावे अशी मागणी होत आहे.इतिहासाच्या प्रत्येक पानावर राजपूत समाजाने शौर्य, साहस, स्वाभिमान या गोष्टी लिहून ठेवल्या. मात्र, काळानुसार समाज बदलत चालला आहे. त्यानुसार रूढी-परंपराही बदलत आहेत. समाजाने आजच्या घडीला एकत्रित येणे ही काळाची गरज बनली आहे. कोल्हापुरात समाजाची ३५ हजार लोकसंख्या असूनही त्यांची आज एकही वास्तू नाही. शासनाकडे याबाबत पाठपुरावा करण्यासाठी समाजातील लोकांनी संघटित व्हावे. - अमरसिंह राजपूत, अध्यक्ष, राजपूत समाज, कोल्हापूर जिल्हापूर्वी पहाटे लग्ने होत होती; कारण या समाजाचे वास्तव्य जंगलात होते. त्याकाळी कधीही शत्रूचा हल्ला होण्याची भीती असायची. त्यामुळे सर्वांत सुरक्षित काळ म्हणून पहाटे लग्ने होत होती. ही प्रथा बंद झाली आहे. सध्या गोरज मुहुर्तावर लग्ने होतात; तर शिंदीच्या पानांपासून बनविलेले मोर-लांडोरीचे टोप लग्नात बाशिंग व मुंडावळ्या म्हणून वापरले जातात. सती जाण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे. याशिवाय महिला आघाडीकडून स्त्रीभू्रण हत्या व शिक्षण, आरोग्यासंबधी जनजागृती केली जात आहे. याशिवाय रक्तदान, वधूवर मेळावा आयोजित केला जातो. शौर्याचा महामेरू ‘महाराणा प्रताप’ यांचा पुतळा उभारणीचे कार्य समाजाचे एकही कार्यालय नसताना गोपालसिंह राजपूत, दत्तूसिंह उमरावसिंह पवार, अमरसिंह परदेशी, अमरसिंह राजपूत, जयराज राजपूत, माधवसिंह राजपूत, रामसिंह राजपूत, निरंजनसिंह ठाकूर, बाळसिंह राजपूत, किसनसिंह राजपूत, किरणसिंह राजपूत, रणजितसिंह राजपूत, रतनसिंह राजपूत, सूरजितसिंह राजूपत, जोगसिंह देवडा, रचनाथसिह परदेशी, मोहनसिंह राजपूत, दिलीपसिंह राजपूत, बबनसिंह चंदेले, जयसिंह राजपूत, संयोगिता राजपूत, भगवानसिंह राजपूत, शामसिंह राजूपत, विठ्ठलसिंह राजूपत, भीमसिंह शिलेदार, ताराबाई ठाकूर यांच्या प्रयत्नांतून महावीर गार्डनमध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा उभा करण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते ३१ मे १९९६ रोजी झाले. आजतागायत ३१ मे रोजी महापौरांच्या हस्ते पुतळ्याची पूजा केली जाते. ‘भामटा’ शब्द लुप्त झालाब्रिटिशकाळात राजपूत लोकांनी लूटमारी व चोरी करू नये म्हणून त्यांना ‘भामटा राजपूत’ असे नाव दिले. भामटेगिरी बंद करावी, याकरिता विविध सवलती दिल्या. कालांतराने ‘भामटा’ हा शब्द लज्जास्पद वाटू लागल्याने समाजातील लोक ‘भामटा’ शब्दाचा उल्लेख टाळू लागले. आज या शब्दावरच शासन अडून बसले आहे. समाजातील लोकांना जातीचे दाखले देताना व जातपडताळणीवेळी ‘भामटा’ हा शब्दाचा उल्लेख नसल्याच्या कारणावरून अडचणी निर्माण होत आहेत.छत्रपती शिवरायांचे घराणेही ‘क्षत्रिय’ कुलावंतातीलछत्रपती घराणेही याच क्षत्रिय राजपूत घराण्यातील असल्याचा उल्लेख राजपूत समाजाच्या अनेक पुस्तकांत आढळतो. ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आयोजित केला होता, तेव्हा पुरोहितांनी ते क्षत्रिय नसल्याचे सांगत राज्याभिषेक करण्यास नकार दिला होता. याच दरम्यान गागाभट्टांना बोलाविण्यात आले. त्यांनी महाराज हे ‘क्षत्रिय’ कुलावंतातील आहेत, याचा दाखला दिला. त्यानंतर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. समाजातील हिरेमाजी महापालिका आयुक्त पृथ्वीराज बायसजिल्हा न्यायाधीश जी. सी. बायसपिंपरी-चिंचवडचे माजी महापालिका आयुक्त व आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशीप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रतापसिंह राजपूत व रजपूतवाडी व चिखलीचे सरपंच म्हणून सहा वेळा मान मिळवणारे केवलसिंग राजपूत.