: टोप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजू कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेेेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रूपाली तावडे होत्या.
ग्रामपंचायतीवर शिवसेना प्रणित टोप ग्रामविकास आघाडीची निर्विवाद सत्ता आहे. या ठिकाणी उपसरपंच पदावर रोटेशन पद्धतीने सर्वांना संधी देण्यात येणार आहे.
संग्राम लोहार यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. यासाठी आज (सोमवार) विशेष सभेचे आयोजन केले होते. सभेत राजू कोळी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी आघाडीचे नेते तानाजी पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष विनोद पाटील, पाडुरंग पाटील, शिवाजी पाटील, बाळासाहेब कोळी, विजय पाटील, श्रीरंग तावडे, संग्राम लोहार, गब्बर पाटील, बाजीराव पोवार, रंजना पाटील, भारती चौगुले, रेखा चौगुले, ग्रामविकास अधिकारी डी. आर. देवकाते आदी उपस्थित होते.