शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

मुख्यमंत्री साखर सम्राटांच्या ताटाखालचं मांजर, राजू शेट्टींची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 1:21 PM

अजित पवार सांगतील तेच धोरण राबविणार असाल तर मंत्री समितीच्या बैठकीची गरज काय?

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जनतेच्या प्रश्नांची जाणीव असणारे कर्तृत्ववान नेते असे आपण समजत होतो. पण ते तर साखर सम्राटांच्या ताटाखालचं मांजर झाल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. अजित पवार सांगतील तेच साखर उद्योगाचे धोरण ठरणार असेल तर मंत्री समितीच्या बैठकीची गरज काय? असा सवालही त्यांनी केला.मागील हंगामातील उसाला उर्वरित चारशे रुपये द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानीचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. उलट तीन टप्प्यात एफआरपी देण्याबाबत कायदा असताना आम्ही एकरकमी पैसे दिल्याचा मुद्दा काही कारखानदारांनी उपस्थित केला. तर मंगळवारी (दि. १७) मंत्री समितीची बैठक आहे. या पार्श्वभूमीवर शेट्टी आक्रमक झाले आहेत. शेट्टी म्हणाले, एकरकमी एफआरपीबाबतचा शासन निर्णय करण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. यासाठी त्यांचे उंबरठे झिजवले, मात्र त्यांचेही साखर सम्राटांच्या पुढे काही चालेना. राज्यात गेल्या हंगामात १० कोटी ५४ लाख टन उसाचे गाळप झाले. साखरेला मिळालेला जादा भाव व इथेनॉलचे उत्पन्न पाहता, राज्यातील कारखान्यांकडे ४१२५ कोटी शिल्लक आहेत. त्यामुळे प्रतिटन चारशे रुपये देणे सहज शक्य आहे. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेकवेळा पटवून देऊनही काहीच होत नाही, मग मंत्री समितीच्या बैठकीत असे वेगळे काय होणार आहे? असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीEknath Shindeएकनाथ शिंदेSugar factoryसाखर कारखाने