शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

‘गोकुळ’वर शेतकरी प्रतिनिधीसाठी आग्रही - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:46 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जर या देशात पेट्रोल शंभर रुपयांनी विकत असेल, तर दूध का नको? असा सवाल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जर या देशात पेट्रोल शंभर रुपयांनी विकत असेल, तर दूध का नको? असा सवाल करत, ‘गोकुळ’ ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मातृसंस्था असून त्यावर शेतकरी प्रतिनिधीच संचालक म्हणून पाठविण्यासाठी आपण आग्रही राहू, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

शेतकरी, वीज ग्राहकांसह इतर प्रश्नांवर ‘स्वाभिमानी’च्यावतीने राज्यभर आंदोलन सुरू केले जाणार आहे, या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दुधाला शंभर रुपये लिटरची मागणी होणे, यात चुकीचे काय आहे? असे सांगत शेट्टी म्हणाले, ‘गोकुळ’च्या निवडणुकीसंदर्भातील चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोण-कोणासोबत जाणार, कोणा-कोणाची आघाडी होणार हे लवकरच समजेल. ‘स्वाभिमानी’ गोकुळच्या निवडणुकीत असणार आहे, दूध संघावर शेतकऱ्यांचा प्रतिनिधी पाठविण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. यावरच आम्ही ठाम राहणार आहे. निवडणुकीचे बिगुल वाजले असले तरी, अद्याप आम्हाला चर्चेसाठी कोणाचेही निमंत्रण आलेले नाही. कोणाचेही निमंत्रण आले तरी शेतकरी प्रतिनिधी ही आमची भूमिका काय राहील, असेही राजू शेट्टी यांनी ठणकावून सांगितले.

यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती पद्माराणी पाटील आदी उपस्थित होते.