शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

गारठणाऱ्या थंडीत राजू शेट्टी यांचा रात्रभर आत्मक्लेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 11:00 AM

rajushetti, Farmer strike, collector, kolhapur केंद्र सरकारने केलेल्या शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, म्हणून दिल्लीत गेली सात दिवस शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गारठणाऱ्या थंडीत खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर आत्मक्लेश आंदोलन केले. टाळ-मृदंगाचाया गजरात भजन करत केंद्र सरकारला सद्‌बुद्धी देवो, अशी प्रार्थना करण्यात आली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी टाळ-मृदंगाचा गजर

कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, म्हणून दिल्लीत गेली सात दिवस शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गारठणाऱ्या थंडीत खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर आत्मक्लेश आंदोलन केले. टाळ-मृदंगाचाया गजरात भजन करत केंद्र सरकारला सद्‌बुद्धी देवो, अशी प्रार्थना करण्यात आली.अदानी, अंबानीसाठी देशातील शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला वठणीवर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा इशारा यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौक ते उद्योग भवनपर्यंतचा रस्ता पोलिसांनी सायंकाळनंतर बंद केला.

रिक्षा थांब्याजवळच आंदोलकांनी रस्त्यावर जाजम टाकून ठाण मांडून होते. शेजारी ओढा असल्याने तिथे थंडीची तीव्रता जास्त होती. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घरातूनच भाकऱ्या बांधून आणल्या होत्या. तिथे खर्डा व पिठलं केले होते, रात्री त्याचा आस्वाद घेतला. या आंदोलनामुळे धरणग्रस्तांच्या आंदोलनाची आठवण ताजी झाली.राजू शेट्टी म्हणाले, नवीन कायद्याच्या आडून बड्या उद्योगपतींना भारतीय अन्न महामंडळ हडप करायचे आहे. त्यांच्या मोक्याच्या जागा ताब्यात घेऊन कमी दराने शेतीमाल खरेदी करून तो गोडावूनमध्ये ठेवायचा आणि सुगी संपल्यानंतर तो चढ्या दराने विक्री करण्याचा घाट आहे. यामध्ये शेतकऱ्यांबरोबर सामान्य ग्राहकही भरडला जाणार आहे.त्यांची डीएनए टेस्ट करादिल्लीत आंदोलन करणारे हे शेतकरी नाहीत, अशी वल्गना भाजपचे नेते करत आहेत. या देशातील अन्नदात्याला जे ओळखत नाहीत, त्यांना डीएनए टेस्ट करावी लागेल, अशी टीका शेट्टी यांनी केली.कोंबड्या घ्या म्हणून पळून जाणारे मोकाटचनवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शाश्वती नाही. एकाने कडकनाथ कोंबड्या घ्या म्हटला आणि पळून गेला तसेच प्रकार या नवीन कायद्याने होणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.शेतकरी खरा कोरोना योद्धाकोरोनाच्या महामारीमध्ये न घाबरता जनतेला खायला मिळावे यासाठी शेतकरी कष्ट करत राहिला. वास्तविक खरे कोरोनायोद्धा शेतकरी असून त्यांना पुरस्कार मिळाला नाही. कोणी दखल घेतली नाही. याउलट मोदी सरकारने विरोधात तीन कायदे केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.थंडीची तमा न बाळगता ८० वयाचे कार्यकर्ते आंदोलनातथंडीची तमा न बाळगता आंदोलनामध्ये स्वाभिमानी संघटनेचे युवा कार्यकर्त्यांसोबत ज्येष्ठ कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. ८२ वयाचे इचलकरंजी येथील शेतकऱ्याचाही यामध्ये समावेश होता. सकाळपर्यंत त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.काँग्रेसचा पाठिंबाआंदोलनला काँग्रेसने पाठिंबा दर्शविला, यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत गुलाबराव घोरपडे, संजय वाईकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmer strikeशेतकरी संपcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर