कोल्हापूर : येथील राजघराण्यातील दत्तक प्रकरणामध्ये ज्या कदमबांडे घराण्याचा सातत्याने उल्लेख होतो त्या घराण्यातील राजवर्धन कदमबांडे हे थोड्याच वेळात सुरू होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. ते या सभेमध्ये भाषण करणार असून त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.कोल्हापूर मतदारसंघांमध्ये महायुतीकडून संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती यांच्यातील लढत रंगतदार बनली आहे. संजय मंडलिक यांनी प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच शाहू महाराजांच्या वारसाचे प्रकरण चर्चेत आणले असून यावरूनच सध्या कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार घमासन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी थेट या घराण्यातील वारस हक्कावर दावा सांगणारे कदमबांडे यांना खास विमानाने धुळ्याहून आणले असून ते मोदी यांच्या सभेमध्ये सहभागी होणार आहेत. याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण ढवळून निघणार आहे निश्चित.'शाहू छत्रपती दत्तक, कोल्हापूरची जनता खरी वारसदार'आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे असे वादग्रस्त वक्तव्य संजय मंडलिक यांनी नेसरी ता. गडहिंग्लज येथे प्रचार सभेत केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर कोल्हापुरात तीव्र पडसाद उमटले होते.
नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापुरातील सभेत राजवर्धन कदमबांडे यांचे भाषण, वारसा प्रकरणावरुन वातावरण ढवळून निघणार?
By समीर देशपांडे | Published: April 27, 2024 4:13 PM