येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सर्वपक्षीय कार्यकर्ते जमा झाले. तेथून ते घोषणा देत गैबी चौकात आले. महाविकास आघाडीतील पक्षांच्या कार्यकर्त्यांसह भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हा बॅंकेचे संचालक भय्या माने, शिवसेनेचे संभाजीराव भोकरे, ‘स्वाभिमानी’चे सागर कोंडेकर, आदींची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नवीद मुश्रीफ, युवराज पाटील, प्रकाश गाडेकर, रमेश माळी, प्रवीण काळबर, नितीन दिंडे, संजय चितारी, सुनील माळी, इंद्रजित घाटगे, अशोक शिरोळे, राजेंद्र साळोखे, सिद्धार्थ नागरत्न, सागर शिंदे, अजित कांबळे, गणेश कांबळे, इरफान मुजावर, अमर सणगर उपस्थित होते.
..................
फोटो कॅपशन
कागल येथे भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बसस्थानक ते गैबी चौक असा मोर्चा काढला.