कोल्हापूर : नागाळा पार्क येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे सुरू असणाऱ्या भगवान महावीर आंतरराष्ट्रीय गुणांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत बुधवारी दुसºया दिवशी मानांकित खेळाडूंनी आगेकूच कायम ठेवली.
तिसºया फेरीअखेर अग्रमानांकित तमिळनाडूच्या रामनाथम् बालसुब्रह्मण्यम्, द्वितीय मानांकित औरंगाबादचा इंद्रजित महिंद्रकर, पुण्याचा तृतीय मानांकित रणवीर मोहिते व कोल्हापूरचा चौथा मानांकित अनिश गांधी यांनी संयुक्तपणे आघाडी कायम ठेवली. यामध्ये शरण राव, जोईस यशस्करा (कर्नाटक), नमित चव्हाण, गणेश ताजने (नाशिक), यश कापडिया (मुंबई), अंजनेया पाठक, वरद आठल्ये (कोल्हापूर), प्रसाद खेडकर (मुंबई), प्रवीण सावर्डेकर (चिपळूण), शिवराज पिंगळे, अनिकेत रेडिज (रत्नागिरी) व अजय परदेशी (जळगांव) हे खेळाडू तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. पाचवा मानांकित वेदांत पिंपळखेर (नाशिक), सातवा मानांकित समीर इनामदार (पुणे), श्रीराज भोसले (कोल्हापूर), साहिल शेजल (पुणे), गुरशेर सिंग (पंजाब), हर्षल वालडे (नाशिक), ओम लमकाने (पुणे), कल्पेश देवांग, उमेश दांडेकर, रघुवीर त्यागी (पुणे), सोहम चाळके (कोल्हापूर) हे खेळाडू अडीच गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. रवींद्र नरगुंदकर (पुणे), बी. एस. नाईक (कोल्हापूर), अनिकेत बापट (सातारा), देवेंद्र चंचाणी, पृथ्वीराज नार्वेकर, एल. पी. खाडिलकर (पुणे), ओजस्वा सिंग (ग्वाल्हेर), दिलीप गोळवणकर (मुंबई), सोहम खासबारदार, आदित्य सावळकर (कोल्हापूर), स्नेहांकित बापट (पुणे), सय्यद मझर यांच्यासह एकूण ५३ खेळाडू दोन गुणांसह संयुक्तपणे तिसºया स्थानावर आहेत.