कोल्हापूर : मुस्लिम बांधवांचा रमजान ईद (ईद उल फित्र) शहरात बुधवारी उत्साहात सर्व धर्मियांनी मिळून साजरा केला. यावेळी मुस्लिम बांधवांना सर्वधर्मियांनी शुभेच्छा दिल्या. रमजान ईदची नमाज परंपरागत पद्धतीने दसरा चौकातील ऐतिहासिक मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर नमाज पठण करण्यात आली.
या ठिकाणी पहिल्या जमातीकरीतता मुफ्ती इरशाद कुन्नुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन व नमाज पठण केली. तर दुसऱ्या जमातच्या नमाजक रिता हाफिज आकिब म्हालदार व तिसरी जमातसाठी हाफीज दस्तगीर चिकोडी यांनी नमाज पठण केले. यावेळी सर्वांनी मिळून कोल्हापूरसह देशाची एकात्मता व सुखशांती कायम राहावी, यासाठी प्रार्थना केली.मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावार मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार सतेज पाटील, माजी खासदार धनंजय महाडीक, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, पोलीस निरीक्षकक वसंत बाबर, तानाजी सावंत, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संदीप देसाई, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, नगरसेवक ईश्वर परमार, नगरसेवक सत्यजित कदम, मल्हार सेनेचे बबन रानगे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष नजीर देसाई, शिवाजी मस्के, उमेश बुधले, यांच्यासह सर्वधर्मिय मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांना गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. संस्थेचे प्रशासक कादर मलबारी यांनी स्वागत , तर चेअरमन गणी आजरेकर यांनी आभार व्यक्त केले. आलेल्या मान्यवरांना मुस्लिम बोर्डींगचे उपाध्यक्ष आदील फरास, संचालक हाजी पापाभाई बागवान, हााजी लियाकत मुजावर, अमीर हमजेखान शिंदी, हाजी जहांगीर अत्तार, रफिक शेख, रफीक मुल्ला, फारूक पटवेगार, अल्ताफ झांजी, मलिक बागवान यांच्या ह्स्ते शिरखुरम्याचे वाटप करण्यात आले.दरम्यान शहरातील बडी मस्जिद, बाराईमाम, विक्रमनगर, केसापुर पेठ, कदमवाडी, घुडणपीर, नंगीवली, ईदगाह मैदान, सदर बझार, शाहुपुरी थोरली मस्जिद, ब्रम्हपुरी मस्जिद, कनाननगर मस्जिद, टाकाळा मस्जिद, शाहू कॉलेज मस्जिद, मार्केट यार्ड मस्जिद, उत्तरेश्वर पेठ मस्जिद, बाबूजमाल दर्गा मस्जिद, लाईन बझार , पाचगाव मस्जिद, प्रगती कॉलनी, गवंडी मोहल्ला, सरदाक कॉलनी, एहलेहदिस मस्जिद, लक्षतीर्थ नवीन मस्जिद, सिरत मोहल्ला मस्जिद, साळोखे पार्क-भारतनगर मस्जिद, जमाादार कॉलनी, निगवे दुमाला आदी ठिकाणच्या मस्जिदमध्ये सकाळी ८:३० ते दहा वाजेपर्यंत नमाज पठण करण्यात आले.उत्साहाचे वातावरणरमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी नवीन कपडे परिधान केले होते, तर प्रत्येकाला त्यांच्या मित्रमंडळींकडून प्रत्यक्ष भेटून आणि मोबाईलद्वारे संदेश पाठवून शुभेच्छा व्यक्त केल्या जात होत्या. त्यामुळे बुधवारी दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.