शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

ग्रामपंचायत निवडणूक :गडहिंग्लज तालुक्यातील ५० गावात रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 5:26 PM

gram panchayat, kolhapur, Election गडहिंग्लज तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ५० ग्रामपंचायती निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच गावात सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच अपेक्षित आहे. नेत्यांच्या गावांसह मोठ्या १० गावातील लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक :गडहिंग्लज तालुक्यातील ५० गावात रणधुमाळी सत्तेसाठी रस्सीखेच होणार, नेत्यांच्या गावात चुरस

राम मगदूम

 गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ५० ग्रामपंचायती निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच गावात सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच अपेक्षित आहे. नेत्यांच्या गावांसह मोठ्या १० गावातील लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.वर्षापूर्वी झालेली विधानसभा निवडणूक आणि आगामी जि. प. व पं. स., गडहिंग्लज बाजार समिती व साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सत्ता संघर्ष रंगणार आहे.स्थानिक पातळीवर सोयीच्या आघाड्यामध्येच सत्तासंघर्ष अपेक्षित आहे. परंतु, राज्यातील बदलती परिस्थिती लक्षता घेता भाजपा विरूद्ध महाविकास आघाडी असेच चित्र या निवडणुकीतही पहायला मिळण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांनी संबंधित सर्व गावांचा दौरा करून कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. तद्वत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांचे कडगाव-कौलगे मतदारसंघातील गावांच्या निवडणुकीवर विशेष लक्ष आहे. परंतु, भाजपासह अन्य पक्षांच्या छावणीत अजूनही सामसूमच आहे.

निवडणूक होणारी गावेऐनापूर, अरळगुंडी, औरनाळ, बेळगुंदी, बुगडीकट्टी, चन्नेकुप्पी, चिंचेवाडी, दुगूनवाडी, दुंडगे, गिजवणे, हलकर्णी, हुनगिनहाळ, हेब्बाळ - जलद्याळ, हेब्बाळ कसबानूल, हिरलगे, हनिमनाळ, इदरगुच्ची, इंचनाळ, जांभूळवाडी, जरळी, कानडेवाडी, खणदाळ, लिंगनूर तर्फ नेसरी, लिंगनूर कसबा नूल, माद्याळ कसबा नूल, मनवाड, मांगनूर तर्फ सावतवाडी, मासेवाडी, मुंगूरवाडी, मुत्नाळ, नंदनवाड, नरेवाडी, नौकुड, निलजी, नूल, शेंद्री, शिंदेवाडी, शिप्पूर तर्फ आजरा, सावतवाडी तर्फ नेसरी, तळेवाडी, तेगिनहाळ, तेरणी, तुप्पूरवाडी, उंबरवाडी, वडरगे, वाघराळी, हसूरचंपू, हरळी बुद्रूक, बसर्गे, चंदनकूड

  • निवडणूक होणारी एकूण गावे - ५०
  • चंदगड मतदारसंघातील गावे - ४२
  •  कागल मतदारसंघातील गावे - ०८

 

डोकेदुखी थांबली..!सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतरच जाहीर होणार आहे. त्यामुळे पॅनेल रचना करताना होणारी स्थानिक नेत्यांची डोकेदुखी थांबली आहे. यावेळी सदस्यांमधूनच सरपंच निवड होणार असल्याने बहुमतासाठी गावा-गावात मोठी चुरस पहायला मिळणार आहे.

लक्षवेधी गावेनूल, गिजवणे, हलकर्णी, बसर्गे, ऐनापूर, इंचनाळ, हेब्बाळ काानूल, तेरणी, दुंडगे, कानडेवाडी

 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक