शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

गडहिंग्लज तालुक्यातील ५० गावांत रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 4:47 AM

राम मगदूम। गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ५० ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ...

राम मगदूम।

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ५० ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच गावांत सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच अपेक्षित आहे. नेत्यांच्या गावांसह मोठ्या १० गावांतील लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. वर्षापूर्वी झालेली विधानसभा निवडणूक आणि आगामी जि. प. व पं. स., गडहिंग्लज बाजार समिती व साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सत्ता संघर्ष रंगणार आहे.

स्थानिक पातळीवर सोयीच्या आघाड्यामध्येच सत्तासंघर्ष अपेक्षित आहे. परंतु, राज्यातील बदलती परिस्थिती लक्षता घेता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असेच चित्र या निवडणुकीतही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांनी संबंधित सर्व गावांचा दौरा करून कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. तद्वत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांचे कडगाव-कौलगे मतदारसंघातील गावांच्या निवडणुकीवर विशेष लक्ष आहे. परंतु, भाजपसह अन्य पक्षांच्या छावणीत अजूनही सामसूमच आहे. ----------------------------------------

* निवडणूक होणारी गावे

ऐनापूर, अरळगुंडी, औरनाळ, बेळगुंदी, बुगडीकट्टी, चन्नेकुप्पी, चिंचेवाडी, दुगूनवाडी, दुंडगे, गिजवणे, हलकर्णी, हुनगिनहाळ, हेब्बाळ-जलद्याळ, हेब्बाळ कसबा नूल, हिरलगे, हनिमनाळ, इदरगुच्ची, इंचनाळ, जांभूळवाडी, जरळी, कानडेवाडी, खणदाळ, लिंगनूर तर्फ नेसरी, लिंगनूर कसबा नूल, माद्याळ, कसबा नूल, मनवाड, मांगनूर तर्फ सावतवाडी, मासेवाडी, मुंगूरवाडी, मुत्नाळ, नंदनवाड, नरेवाडी, नौकुड, निलजी, नूल, शेंद्री, शिंदेवाडी, शिप्पूर तर्फ आजरा, सावतवाडी तर्फ नेसरी, तळेवाडी, तेगिनहाळ, तेरणी, तुप्पूरवाडी, उंबरवाडी, वडरगे, वाघराळी, हसूरचंपू, हरळी बुद्रुक, बसर्गे, चंदनकूड ----------------------------------------

* निवडणूक होणारी एकूण गावे - ५०

* चंदगड मतदारसंघातील गावे - ४२

* कागल मतदारसंघातील गावे - ०८

----------------------------------------

* डोकेदुखी थांबली..! सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतरच जाहीर होणार आहे. त्यामुळे पॅनेल रचना करताना होणारी स्थानिक नेत्यांची डोकेदुखी थांबली आहे. यावेळी सदस्यांमधूनच सरपंच निवड होणार असल्याने बहुमतासाठी गावा-गावांत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

* लक्षवेधी गावे

नूल, गिजवणे, हलकर्णी, बसर्गे, ऐनापूर, इंचनाळ, हेब्बाळ, कसबा नूल, तेरणी, दुंडगे, कानडेवाडी