शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

‘पद‌्माराजे’ प्रभागात सरसावल्या रणरागिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:23 AM

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीत गेल्या तीस वर्षांपासून कायम चर्चेत राहणाऱ्या आणि कोण जिंकणार, याची उत्कंठा वाढविणाऱ्या शिवाजी पेठेतील प्रभाग ...

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीत गेल्या तीस वर्षांपासून कायम चर्चेत राहणाऱ्या आणि कोण जिंकणार, याची उत्कंठा वाढविणाऱ्या शिवाजी पेठेतील प्रभाग क्रमांक ५५ ‘पद्माराजे उद्यान’मधून विजय मिळवण्यासाठी दोन माजी नगरसेविकांसह सात रणरागिणी सरसावल्या आहेत. यावेळची निवडणूक इर्षा, विश्वासार्हता, दगाबाजी, नातेसंबंध आणि भाऊबंदकी अशा अनेक अंगानी चर्चेत राहणार आहे.

प्रभाग क्रमांक ५५ पद्माराजे उद्यान हा शिवाजी पेठेचा मुख्य भाग आहे. येथील निवडणूक कायम चर्चेची, इर्षेची तसेच अस्तित्वाची राहिली आहे. १९९०ची निवडणूक आजही शहरवासियांच्या लक्षात आहे. गेल्या तीस वर्षांत निवडणुकीत तिच तिच घराणी चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली, केवळ उमेदवार बदलले गेले. पण इर्षा काही कमी झाली नाही.

निवडणुकीला वेताळ तालीम विरुध्द खंडोबा तालीम असाही मुलामा दिला जातो. परंतु, दोन्ही मंडळांतील कटुता निवडणूक संपताच कमी होते. कै. रामभाऊ चव्हाण व कै. बबनराव कोराणे यांनी वेताळ तालीम परिसरातून सातत्याने एकमत घडवून आणत एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. त्याला मागच्या चार निवडणुकीत चांगले यश आले. परंतु, यावेळी चव्हाण - कोराणे यांचे नसणे हीच वेताळ तालीम परिसराची डोकेदुखी बनली आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गेल्या निवडणुकीत कोराणे यांना शब्द दिला होता. तो त्यांनी यंदा खरा करुन दाखवत अर्चना उत्तम कोराणे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर केली. मुश्रीफ यांच्या शब्दाला मान देत अजित राऊत यांनी त्यांच्या पत्नी माजी महापौर सुनीता राऊत यांची उमेदवारी मागे घेतली. मुश्रीफ यांनी राष्ट्रवातील गुंता सोडवला असला, तरी त्यांच्याच पक्षाचे नगरसेवकपद रद्द झालेले अजिंक्य चव्हाण यांनी आपली पत्नी पूजा चव्हाण यांना निवडणुकीत उभे करुन आव्हान निर्माण केले आहे.

खंडोबा तालीम परिसरातून माजी नगरसेविका माधवी विक्रम जरग, सविता महेश चौगले निवडणूक लढविणार आहेत. चौगले यांच्यापेक्षा जरग कुटुंबाची ताकद जास्त असल्याने कोराणे यांना माधवी जरग याच जोराची टक्कर देतील, यात शंकाच नाही. विक्रम जरग यांना निवडणूक कौशल्य आत्मसात आहे. शिवाय कोराणे - चव्हाण यांच्यातील मतभेदाचा सर्वाधिक लाभ जरग यांना होण्याची शक्यता आहे. सुनिता राऊत या संभाजीनगर बसस्थानक प्रभागातून निवडणूक लढविणार असून, त्यांना कोराणे यांनी निवडून आणण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे तिकडे दगाफटका झालाच, तर इकडेही त्याचे परिणाम उमटतील.

कोराणे, चव्हाण, जरग या पारंपरिक घराण्यांबरोबरच आता सुजाता मोहन चव्हाण, सरिता रवींद्र सासने, डॉ. श्वेता कुलदीप गायकवाड यांनीही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सुजाता चव्हाण या माजी महापौर विलासराव सासने यांच्या कन्या, सरिता सासने या काॅंग्रेसचे कार्यकर्ते बाळ सासने यांच्या पत्नी तर डॉ. श्वेता सराफ या संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांच्या पत्नी आहेत.

कोट - प्रभागातील सर्व नागरी समस्या सोडविण्याचा प्रयत्न आपण केला. काही कामे अपूर्ण असून, ती सध्या सुरु आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तेथे नवीन जलवाहिन्या टाकल्या आहेत.

- अजित राऊत, माजी नगरसेवक

प्रभागातील झालेली कामे व समस्या

ड्रेनेज व गटारांची कामे अपूर्ण आहेत. मरगाई गल्लीसह अन्य गल्लीत हा प्रश्न गंभीर आहे. बाकी प्रभागातील सर्व रस्ते पूर्ण झाले आहेत. पिण्याच्या पाईपलाईन बदलल्या असल्याने पाणीप्रश्न सुटला आहे.

गत निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते -

- अजिंक्य चव्हाण (राष्ट्रवादी) १९३३

- विक्रम जरग (ताराराणी आघाडी) - १११७

- महेश चौगले (शिवसेना) - ६३३

पोटनिवडणुकीत मिळालेली मते -

- अजित राऊत (राष्ट्रवादी) - १७०६

- पियुष चव्हाण (शिवसेना) - ६४३

- महेश चौगुले (अपक्ष) - ३४४

- राजेंद्र चव्हाण (अपक्ष) - ३३४

- स्वप्नील पाटोळे (१७२)