कोल्हापूर : ‘लोकमत’तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर अवॉर्ड’साठी राजकीय क्षेत्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यात चुरस आहे. ‘लोकमत’ने या अवॉर्डची घोषणा केल्यानंतर त्यांची निवड करण्यासाठी आॅनलाईन मतदानाचे आवाहन करताच प्रचंड चुरस वाढली आहे.कोकणासह राज्याच्या राजकारणात एक धडाडीचे नेतृत्व म्हणून नारायण राणे यांच्याकडे पाहिले जाते. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉँग्रेसची एकहाती सत्ता पुन्हा आणली. मात्र, प्रदेश कॉँग्रेसच्या कारभारावर नाराज असलेले राणे यांनी लवकरच मोठा राजकीय भूकंप घडवून आणेन, असे स्पष्ट केल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेत भाजपला प्रथमच स्पष्ट बहुमतासह सत्तारूढ करून राजकारणाला नवे वळण दिले आहे. परिणामी त्यांच्या नावाचा गाजावाजा सुरू आहे. त्यामुळे आॅनलाईनद्वारे त्यांना मतदान करणाऱ्या चाहत्यांची संख्या वाढली आहे. याच विभागातील तिसरे स्पर्धक सहकारमंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांचे राजकीय वजनही वाढले आहे. त्यांच्या सोलापूर जिल्ह्यात त्यांनी कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांवर मात करीत महापालिका आणि जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकविला आहे. शिवाय ते सांगलीचे पालकमंत्री आहेत आणि या जिल्ह्यात भाजपकडे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची सत्ता आली आहे. या तिन्ही मातब्बर नेत्यांसाठी ६६६.’ङ्म‘ें३.ूङ्मे वर मतदान करण्यासाठी चाहत्यांमध्ये चुरस वाढत आहे.
राणे, देशमुख, बापट यांच्यात ‘महाराष्ट्रीयन अवॉर्ड’साठी चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2017 1:05 AM