शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

राणेंनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी : जठार

By admin | Published: July 23, 2014 9:40 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्याची काळजी आम्ही समर्थपणे घेऊ

जामसंडे : नारायण राणे यांनी राजीनामा देण्याऐवजी राजकारणातून सन्मानपूर्वक निवृत्ती घ्यावी, असा टोला आमदार प्रमोद जठार यांनी जामसंडेमधील पत्रकार परिषदेत दिला. त्यांनी आपल्या प्रकृतीला त्रास करून घेऊ नये. सिंधुदुर्ग जिल्ह्याची काळजी आम्ही समर्थपणे घेऊ, असेही प्रमोद जठार यांनी सांगितले.जठार म्हणाले, नारायण राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी उद्योगपतींमार्फत मध्यस्थी केली. भरपूर प्रयत्नही केले. मात्र भाजपाचे राज्यातील, कोकणातील नेते व शिवसेनेच्या जाहीर विरोधामुळे त्यांचा भाजपात प्रवेश होऊ शकला नाही. आमच्यादृष्टीने नारायण राणेंचा विषय इतिहासजमा झाला असून आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वर्तमान व भविष्याचा विचार करण्याची गरज आहे. तसेच यावेळी जठार यांनी देवगड किल्ला येथील पर्यटन प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यटन खात्याकडून प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचे सांगितले. यासाठी केंद्राकडून ५ कोटी तर राज्याकडून २.५० कोटींचा निधी मिळणार आहे. एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांकडून या जागेची पाहणी करण्यात येणार आहे, असेही प्रमोद जठार यावेळी म्हणाले.आॅगस्ट महिन्यात हेलियम डे वेळी विजयदुर्ग येथे गोव्याचे पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. या दिवशी कणकवलीमध्ये पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. देवगडमधील आंबेरी पूल ते वेंगुर्लामधील आरोंदापर्यंतच्या सागरी महामार्गास पर्यटन महामार्गाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार आहोत, असेही प्रमोद जठार यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम उपस्थित होते. (वार्ताहर)