राशिवडे ग्रामपंचायतीत गोकुळचे माजी संचालक पी.डी. धुंदरे व भोगावतीचे संचालक कृष्णराव पाटील यांची सत्ता आहे. उपसरपंच अनिल वाडकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. या पदासाठी आज निवडणूक झाली. भोगावतीचे माजी संचालक अविनाश ऊर्फ नंदूभाऊ पाटील, राजेंद्र पाटील यांच्या गटातर्फे राजाराम कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक झाली. यामध्ये रंगराव चौगुले यांना बारा तर राजाराम कांबळे यांना पाच मते मिळाली. यावेळी गोकुळचे माजी संचालक पी.डी. धुंदरे, माजी सरपंच बी.एन.गोंगाणे, प्रकाश चौगले, सागर धुंदरे, अतुल पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, रमाकांत तोडकर, किरण बिल्ले, कृष्णात पाटील, आनंदा चौगले (शाहीर), सात्ताप्पा चौगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार ग्रामविकास अधिकारी शिवाजी आरडे यांनी मानले.
फोटो २३ रंगराव चौगले
फोटो मेलवर पाठवला आहे.