शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

Rangpanchami: मंत्री सतेज पाटीलांनी फेस पेंटिंग तर ऋतुराजने धरला ठेका, शारंग महोत्सवात तरुणाईची धमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 6:19 PM

कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या अंतानंतर यंदाची ही रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी झाली

कळंबा : गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी उत्तरच्या राजकीय धुळवडीतुन वेळात वेळ काढत शारंग महोत्सवात हजेरी लावून तरुणाईला रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महिलांच्या आग्रहाखातर मंत्री पाटील यांनी फेस पेंटिंग करून घेत चेहऱ्यावर दोन्ही बाजूंना तिरंगा काढून रंगपंचमीचा आनंद घेतला. तर दक्षिणचे युवा आमदार आमदार ऋतुराज पाटील यांनी डी.जे च्या गाण्यावर ठेका धरला. यावेळी महिला युवतींच्या जल्लोषाला एकच उधाण आले.क्रेशर चौकात आयोजित शारंग महोत्सवात दक्षिणचे युवा आमदार ऋतुराज पाटलांचे दुपारी बारा वाजता आगमन होताच युवतींची सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाली. कोरड्या रंगाची उधळण, रेनडान्स आणि डी जे च्या तालावर महिलांना मनमुराद आनंद घेताना पाहताच आपसूकच आमदार ऋतुराज पाटील यांनीही गाण्यावर ठेका धरला.काही वेळानंतर याठिकाणी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचीही एंट्री झाली. मंत्री पाटील यांचे आगमन होताच पुन्हा उत्साहास उधाण आले आणि रंगपंचमीचा ज्वर शिगेला पोहोचला. गृहराज्यमंत्र्यांनी कोरोना नंतर आलेल्या रंगपंचमीच्या उत्सवाच्या शुभेच्छा देत महिलांच्या आग्रहाखातर फेस पेंटिंग करून घेतले. चेहऱ्यावर दोन्ही बाजूंना तिरंगा काढून घेत यावेळी रंगपंचमीचा आनंद घेतला.कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या अंतानंतर यंदाची ही रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी झाली. शारंग महोत्सवात तर तरुणाईने उच्चांकी गर्दी केली होती. यावेळी पुष्पा चित्रपटातील गाण्यांवर बेभान होऊन नाचत महिलांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. त्यांना साथ दिली निवेदिका मोनिका जाजू आणि डी जे स्टेला मसिन यांनी. यावेळी महिलांसाठी डान्स, उखाणे, फेसपेंटिंग आदी आकर्षक पारितोषिकांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.माजी नगरसेविका दीपा मगदूम, शोभा कवाळे, पूजा नाईनकवरे, मेहजबिन सुभेदार, प्रमिला देशमुख, प्रीती देशमुख यांच्या समवेत रंगपंचमीचा कारेक्रमाचा परिसरातील सुमारे हजारावर महिलांनी आनंद घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलRuturaj Patilऋतुराज पाटील