कोल्हापूर : ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रणजितसिंह पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांच्यासह अनेकांनी रविवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये उद्योजक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ यांचे चुलतबंधू महावीर गाठ, चंदूरचे विक्रांतसिंह कदम, भुदरगडचे युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष देवराज बारदेसकर यांच्यासह अनेक सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनीही यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेश केलेल्या नेत्यांच्या जयजयकाराने हॉटेल पॅव्हेलियनचा परिसर दुमदुमून गेला. गेले पंधरा दिवस भाजपच्या चमूने केलेल्या प्रयत्नांना यश आल्यानंतर मंत्री पाटील यांनी रविवारी सकाळी भाजप, ताराराणी, जनसुराज्यच्या नेत्यांसमवेत बैठक घेऊन सर्व राजकीय हालचालींचा आढावा घेऊन ही घोषणा केली. तत्पूर्वी, त्यांनी भाजपमधील नेत्यांची बैठक घेऊन विस्तृत चर्चा केली. पाटील म्हणाले, चंदगडमध्ये कुपेकर गट आणि भाजप एकत्रित निवडणूक लढवतील. चंदगड तालुका विकास आघाडीची यासाठी स्थापना करण्यात आली आहे. गोपाळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली चंदगड तालुक्यातील भाजप जिल्हा परिषदेच्या दोन, तर कुपेकर गट दोन जागा लढवील. हातकणंगले तालुक्यात भाजप-ताराराणी आघाडीसोबत आता धैर्यशील माने यांची युवक क्रांती आघाडी आमच्यासोबत येत असून, तिथे ताराराणी आघाडी पाच, तर युवक क्रांती आघाडी दोन जागांवर जिल्हा सुरू आहे. मुंबईतील चर्चेच्या फेऱ्यांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यानुसार या सर्व जागा भाजप आपल्याकडे ठेवून घेणार नाही, तर त्यातील काही जागा समन्वयाने सोबत येतील त्यांच्यासाठी सोडण्यात येणार आहेत. पेठवडगावला आम्ही डॉ. अशोक चौगुले यांना प्रथम प्रवेश दिल्यानंतर नंतर कुणाशीही चर्चा केली नाही. त्यामुळे आम्ही दिलेला शब्द पाळतो; म्हणूनच भाजपकडे अनेकांचा ओढा वाढला आहे. त्यांतील कुणालाही नाराज न करता त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही बांधील आहोत. ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरूप महाडिक म्हणाले, आम्ही कोल्हापूर महापालिकेपासून भाजपसोबत आहोत. याहीपुढे भाजपसोबतच राहणार आहोत. ‘जनसुराज्य’चे प्रवक्ते विजयसिंह जाधव म्हणाले, आमचे नेते विनय कोेरे आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्यात चर्चा झाली असून, त्यानुसारच पुढचे नियोजन केले जाईल. या पत्रकार परिषदेवेळी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, संघटनमंत्री बाबा देसाई, अरुण इंगवले, सुनील कदम, ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर, अनिल यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेट्टी-खोत अंतर वाढू नयेभाजपच्या पाठिंब्यावरून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात दरी वाढत आहे, याबाबत विचारणा केल्यानंतर पाटील म्हणाले, ही संघटना टिकावी हीच आमची इच्छा आहे. सरकारची गोष्ट वेगळी आहे. मात्र शेतकऱ्यांच्या भल्यासाठी चळवळ कायम राहणे गरजेचे आहे. त्यामुळे शेट्टी आणि खोत यांच्यामधील अंतर वाढावे, अशी आमची इच्छा नाही. .चंदगड तालुका दुर्गम असून तो दुर्लक्षित आहे. पर्यटनाच्या माध्यमातून हा तालुका देशाच्या पातळीवर नेता येईल; परंतु त्यासाठी शासनाच्या पाठबळाची गरज आहे. या सर्व प्रश्नांना गेल्या दोन वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पक्ष, गट न पाहता मदत केली आहे. एव्हीएच प्रकल्पाबाबत तर विरोधात असतानाही आणि नंतर मुख्यमंत्री झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या हिताची भूमिका घेतली; म्हणूनच चंदगड तालुक्याच्या विकासाच्या हाळवणकर, तुम्हाला जिल्ह्याचे नेतृत्व करायचेय : चंद्रकांतदादापत्रकार परिषदेला भाजपचे नेते, नवीन प्रवेश केलेले नेते यामुळे मोठी गर्दी झाली. नेत्यांना बसण्यासाठीच खुर्च्या कमी पडल्या. त्यामुळे सुरेश हाळवणकर यांना एका बाजूला बसावे लागले. मात्र, चंद्रकांतदादांनी खुर्ची आणायला लावून ती आपल्याजवळ ठेवून हाळवणकर यांना जवळ बसवले. हाळवणकर कडेला कुठे बसता, उद्याचे जिल्ह्याचे नेतृत्व तुम्हालाच करायचे आहे, अशी टिप्पणी केली. त्यामुळे हाळवणकर यांना पुढच्या काळात मोठी संधी असल्याची चर्चा सुरू होती.
रणजितसिंह पाटील भाजपमध्ये
By admin | Published: January 23, 2017 12:53 AM