शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

रंकाळ्याचे ‘शुद्धि’करण

By admin | Published: June 15, 2015 12:41 AM

पहिल्या टप्प्यात खण स्वच्छ : विकासाआड राजकारण नको : पालकमंत्री

डॉ. कुमुद गोसावी - पहाटवाऱ्याचा हळुवार स्पर्श होताच, गोड गुलाबी स्वप्नाचं झुंबर हलताच पापण्यांची पाखरं फडफडली! नि डोळ्यांची दारं उघडली. ‘स्वप्न की वास्तव? नेमकं कोणतं स्वीकारावं?’ या द्वंद्वातच सनईचे मंजूळ स्वर साद घालून गेले! तरीही ते नेमके स्वप्नातील नसतील कशावरून? या समजुतीनं डोळ्यांची कवाडं नुसती पुनश्च किलकिलतच राहिली! हीच तर मनाची द्विधावस्था! बहिणाबाई चौधरींनी मनाला ‘वढाय, वढाय’ का म्हटलंय हे ध्यानी येतं. अर्जुनासारख्या धुरंधर धनुर्धराची, संत-महंतांची, ऋषीमुनींची या द्विधेनं पाठ सोडली नाही तिथं सामान्यांची काय कथा?‘तुज सगुण म्हणु की निर्गुण रे।’सगुण-निर्गुणाच्या द्वैतातून परमेश्वर रूपाचा शोध घेत-घेतच संतांनी अखेर ‘सगुण-निर्गुण अंती एकचि रे।’ असा अद्वैतभाव दिला. देव पाहावया गेलो। देव होऊनची ठेलो। असं अद्वैत अनुभूतीनं स्पष्ट होतं! सामान्यांनाही या अवस्थेनं प्रारंभी चिंतेच्या भोवऱ्यात अडकवलं असलं, तरी सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवण्याचं बळ त्यांना दिलं. पुष्कळ वेळा लहान मुलांची रस्ता ओलांडताना जशी द्विधावस्था होते तशी आयुष्यातील अनेक वाटा पार करताना मोठ्या माणसांचीही होते!सध्याच्या धकाधकीच्या व्यस्त जीवनात आपली द्विधावस्था अनेकवार होते. सुखात सर्व साथी मात्र ज्यावेळी वळवाच्या पावसासारखं एखादं संकट कोसळतं त्यावेळी नेमकं कोण आपलं नि कोण परकं? हे कळतं. प्रत्येक जण स्वत:च्या कोशातच राहण्यात उत्सुक असेल तर दुसऱ्यांच्या सुख-दु:खाची दखल कोण घेणार? बालपणातील निरागस बागडणं, यौवनातील काव्य आस्वादणं वा आयुष्याची सांजवात लावताना समईच्या मंद प्रकाशात आयुष्याकडं मागं वळून पाहणं या साऱ्या अनुभूतीचं आपल्या मनातील द्विधावस्थेशी एक अनामिक नातं असतं. आपल्या जीवनातील कितीतरी ओव्यांना नि अभंगांना या द्विधावस्थेनं घडवलं आहे! कधी रडवलंय तर कधी एखाद्या जीवनदर्शी संदेशानं मढवलंयदेखील. सदाचाराच्या संजीवक स्पर्शानं आपण द्विधावस्थेतून बाहेर येतो, शांत प्रसन्न मनात जाईजुईच्या उमलत्या कळ्यातील गंध घेतो तसा मुक्त मनानं जीवनाचा आनंद लुटतो. वामन अवतारात भगवंतानं बळीराजाला ‘त्रिपाद भूमी’चं दान मागितलं तेव्हा त्यांचे गुरू शुक्राचार्य म्हणाले, ‘हे दान देऊ नकोस! पस्तावशील!’ तेव्हा क्षणभर बळीराजाची द्विधावस्था झाली! परंतु दुसऱ्याच क्षणी बळीराजानं गुरुआज्ञेहूनही दिलेलं वचन श्रेष्ठ मानलं नि दैत्यराज बलीनं आपलं सर्वस्व (वामन रूपानं आलेल्या) भगवान विष्णूच्या चरणी अर्पण केलं! म्हणजे माणसाची सद्सद्विवेकबुद्धी जागृत असेल तर द्विधावस्थेतून बाहेर येता येतं! हे सिद्ध होतं!