शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
2
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
3
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
4
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
6
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
7
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
8
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
9
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
10
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
11
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
12
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
13
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
14
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
15
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
16
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
17
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
18
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले
19
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
20
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना

Kolhapur: गडहिंग्लजमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, परप्रांतीय दोघांविरुद्ध गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 12:46 IST

एकजण ताब्यात, संतप्त जमावाकडून दुकानाची तोडफोड

गडहिंग्लज : मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी परप्रांतीय दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित शहजाद शेख (रा. शंभरपूर, जि. गोंडा, उत्तर प्रदेश) व त्याला पळून जाण्यास मदत केल्याबद्दल बरकतअली रईस पाशा (रा. काजूबाग, गडहिंग्लज) अशी त्यांची नावे आहेत. बरकतअली याला ताब्यात घेतले असून शहजादच्या तपासासाठी पोलिस पथक रवाना केले आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांनी पत्रकारांना दिली.

अधिक माहिती अशी, शहरातील कडगाव रोडवरील काजूबाग परिसरात ‘पीओपी’चे काम करणारे बरकतअली पाशा यांचे दुकान आहे. त्या दुकानाच्या परिसरात मोलमजुरी करणारे कुटुंब वास्तव्याला असून पीडित मुलगी शहरातील शाळेत पाचवीत शिकते.

आठवड्यापूर्वी आजारी असल्यामुळे पीडित मुलगी घरी एकटीच होती. तिचे आई-वडील मोलमजुरीसाठी बाहेर गेले होते. घराबाहेर भांडी घासत असताना शहजाद याने मोबाईलवर तिचे फोटो काढले. फोटो काढल्याचे लक्षात येताच तिने ते फोटो डिलीट करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने तिची लगट करण्याचा प्रयत्न केला होता. गुरुवारी (वय २८) संध्याकाळी पीडित मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच बरकतअली याने शहजादला जाब विचारून चोप दिला. त्यानंतर तो शहरातून पळून गेल्याची चर्चा सुरू झाली.

दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच संतप्त तरुण सायंकाळी शहरातील लक्ष्मी मंदिरात एकत्र आले. त्यानंतर घोषणाबाजी करत जमाव पोलिस ठाण्यासमोर आला. अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या व त्याला मदत करणाऱ्या त्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. गुन्हा दाखल केल्याशिवाय हटणार नाही, असे म्हणत पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला.

पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी संतप्त जमावाला शांत केले. पीडित मुलीच्या पालकांची फिर्याद घेऊन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. त्यामुळे कायदा हातात न घेता शांतता व सुव्यवस्था कायम राखावी, असे आवाहन केले. मात्र, त्यानंतरही तासभर गोंधळ सुरूच होता. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मालकाच्या दुकानाची तोडफोडपीओपी कारागिरीचा व्यवसाय करणारे बरकतअली हे सुमारे २५ वर्षे गडहिंग्लजमध्ये वास्तव्यास आहेत. काजूबाग परिसरात त्यांचे दुकान व साहित्याचे गोडावून आहे. त्याच्या कामगाराने केलेल्या गैरकृत्याची माहिती मिळताच संतप्त जमावाने त्याच्या दुकानावर हल्ला केला व दुकानातील साहित्याची तोडफोड केली.

संशयिताच्या शोधासाठी पथक रवानासंशयित शहजाद हा दोन महिन्यांपूर्वी बरकतअली यांच्याकडे कामाला आला आहे. त्याच्या गैरकृत्याची माहिती मिळताच जाब विचारून त्यांनी त्याला चोप दिल्याने तो घाबरून पळून गेला. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

‘व्हॉटसॲप’वरून आवाहनउत्तर प्रदेशातील पीओपी व्यावसायिकाच्या कामगाराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. त्यामुळे परप्रांतीयांना गडहिंग्लजमधून हाकलून काढण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी लक्ष्मी मंदिरात जमावे, असे आवाहन व्हॉटस्ॲपवरून करण्यात आले होते. त्यामुळे संतप्त जमावात विविध व्यावसायिक आणि व्यापारीदेखील सहभागी झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस