शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
2
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
3
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
4
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
5
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
6
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
7
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
8
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
9
'या' चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी; 5 गोष्टी समजून घ्या
10
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट
11
मनोज जरांगेंनी कंबर कसली; दसरा मेळाव्याची सुरु केली तयारी, विविध ठिकाणी देणार भेटी
12
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
13
धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला
14
ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
15
गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार
16
"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल
17
“मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसेचे पालन करत नाहीत”; काँग्रेसची टीका
18
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
19
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
20
Gold Price Review: सोन्यापेक्षा चांदी अधिक महागली, महिन्याभरात ७१०२ रुपयांनी वाढली किंमत; कारण काय?

हेल्मेट सक्तीविरोधात तीव्र आंदोलन

By admin | Published: July 25, 2016 1:00 AM

संघर्ष समितीचा निर्धार : पुढील आठवड्यात आंदोलनाची सुरुवात

कोल्हापूर : राज्य सरकारने केलेली हेल्मेट सक्ती अन्यायकारक आहे. ही सक्ती रद्द करण्यासाठी कोल्हापुरात तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार रविवारी हेल्मेटविरोधी संघर्ष समितीने केला. तसेच या आंदोलनाची सुरुवात पुढील आठवड्यात जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी हेल्मेटविरोधी संघर्ष समितीची हिंदू एकताच्या कार्यालयात बैठक झाली. त्यात समितीचे निमंत्रक जयकुमार शिंदे म्हणाले, हेल्मेट सक्ती जनतेवर अन्यायकारक आहे. सक्ती करणाऱ्या परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा निषेध करतो. हेल्मेटच्या सततच्या वापरामुळे मणक्यांचा त्रास होतो शिवाय ते नेहमी हाताळणे सोयीस्कर नाही. जिल्ह्यात घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या प्रकारात चोरट्यांनी हेल्मेटचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. हेल्मेटच्या सक्तीमुळे असे गुन्हे वाढण्याची शक्यता आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे हेल्मेट सक्तीविरोधात संघर्ष समितीतर्फे टप्प्या-टप्प्याने तीव्र आंदोलन केले जाईल. त्याची सुरुवात पुढील आठवड्यात जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन केली जाणार आहे. रामेश्वर पत्की म्हणाले, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, शाळा-महाविद्यालय, विविध शासकीय-खासगी कार्यालयांतील दुचाकीधारकांची रॅली, परिवहन कार्यालयासमोर हेल्मेट फोडो आंदोलन, स्वाक्षरी मोहीम, आदी टप्प्यांनी आंदोलन तीव्र केले जाईल. किसन कल्याणकर म्हणाले, या आंदोलनाअंतर्गत पहिल्या टप्प्यात हेल्मेट सक्तीविरोधातील दहा हजार पत्रकांचे वाटप केले जाईल. आंदोलनात विविध संघटनांना सहभागी करून व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. नितीन जोशी म्हणाले, हेल्मेट सक्ती करण्याऐवजी रस्त्यांची अवस्था सुधारणांसह वाहतुकीच्या नियम पालनाबाबत प्रबोधनाची मोहीम शासनाने राबवावी. बैठकीस माजी नगरसेवक मधुकर रामाणे, धोंडिराम चोपडे, बाबा महाडिक, चंद्रकांत हलके, विजय निकम, शीतल नलवडे, अमेय माने, सुरेश बट्टेवार, महेश सासने, फिरोजखान वस्ताद, सुभाष कोळी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)