कोल्हापूर : रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील मानेनगर परिसरात दुर्मीळ जातीचे पाणमांजर आढळून आले. करवीर वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते व वनपाल साताप्पा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचाव पथकाने त्याची सुटका केली. रेंदाळ येथील मानेनगर परिसरात काल, बुधवारी रात्री गटारीत भेदरलेल्या अवस्थेत बसलेले हे दुर्मीळ जातीचे पाणमांजर आढळले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. पाण्याजवळ अधिवास करणारे हे पाणमांजर पहिल्यांदाच या भागात आढळून आल्याने त्याच्याबद्दल कुतूहल वाढले आहे.
कोल्हापुरातील रेंदाळमध्ये आढळले दुर्मीळ पाणमांजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 16:59 IST