कोल्हापूर : प्रस्थापित घराण्यांच्या धनशक्तीविरुद्ध सर्वसामान्यांच्या विकासाच्या विचारांची लढाई कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष करणार आहे. मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसह शहराच्या विकासासाठी पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. आम्ही ३५ जागा लढविणार असल्याचे पक्षाचे मुख्य निरीक्षक भीमराव जामुने व केंद्रीय सचिव दशरथ राऊत यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांनी आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.जामुने म्हणाले, पायाभूत सुविधांचा अभाव, कचरा व्यवस्थापनातील गोंधळ आणि प्राथमिक शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार, आदींमुळे कोल्हापूरकर त्रस्त झाले आहेत. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर यायचे आणि सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करायचे, हे येथील विविध पक्षाच्या कारभाऱ्यांनी केले आहे. पायाभूत सुविधांच्या पूर्ततेसह शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष महानगरपालिकेची निवडणूक लढवीत आहे. शहराच्या विकासाची बांधीलकी व निष्ठा असलेले ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आम्ही उतरविणार आहे. यात पहिल्या आठजणांची यादी गुरुवारी जाहीर केली आहे. उर्वरित २७ जणांची यादी रविवारी (दि. ११) जाहीर केली जाईल. निवडणुकीबाबत गेल्या तीन महिन्यांपूर्वी चाचपणी केली आहे. त्यानंतरच आम्ही लढण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सोशल इंजिनिअरिंग’द्वारे प्रभागांतील घराघरांमध्ये आम्ही पोहोचलो आहोत. त्यामुळे निवडणुकीत निश्चितपणे आम्हाला चांगले यश मिळेल. राऊत म्हणाले, केंद्रात २४ आणि राज्यात १२ व्या क्रमांकावर आमचा पक्ष आहे. निवडणूक आयोगाकडे आवश्यक त्या बाबींची पूर्तता केल्याने पक्षाची मान्यता कायम असून, ‘कपबशी’ चिन्हाची काही अडचण नाही. पत्रकार परिषदेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल पुजारी, जिल्हाध्यक्ष यशवंतराव शेळके, शहराध्यक्ष रतन बाणदार, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्याला संधीराष्ट्रीय समाज पक्ष पहिल्यांदाच कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवीत आहे. पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या आठजणांच्या यादीत सर्वसामान्यांना संधी दिली आहे. यात कसबा बावडा येथील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते शंकर मारुती चेचर यांना कसबा बावडा पूर्व बाजू या प्रभागातून पक्षाने उमेदवारी दिली आहे. चेचर हे कोल्हापूर शहर (महानगर) वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शहर संघटकपदी कार्यरत आहेत. गेल्या ३२ वर्षांपासून ते वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्यरत आहेत.भाजपकडे विचारणाभाजपकडे आम्ही १५ जागांची मागणी केली होती; पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे, असे भीमराव जामुने यांनी सांगितले. ते म्हणाले, आम्हाला मुळात आघाडी करायची नव्हती. मात्र, युतीचा धर्म म्हणून त्यांना विचारणा केली होती.उमेदवार असे...उमेदवारप्रभाग शंकर मारुती चेचरकसबा बावडा पूर्वदिलीप शामराव कांबळेव्हीनस कॉर्नरलक्ष्मी दशरथ भोसलेकॉमर्स कॉलेजगणेश दत्तात्रय निऊंगडेदौलतनगररवींद्र आनंदराव राऊतआपटेनगर- तुळजाभवानीनगरअर्चना विक्रमसिंह जरगसुर्वेनगरगीता श्रीकांत बंदसोडेकणेरकरनगरपंडित सहदेव चौगलेक्रांतिसिंह नाना पाटीलनगर
महापालिका निवडणुकीच्या रिंगणात ‘रासप’
By admin | Published: October 09, 2015 12:56 AM