केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. करार, किंमत हमी व शेती सेवा कायदा, शेतकरी शेती माल कायदा व विक्री कायदा, अत्यावश्यक वस्तू या सर्व कायद्यांना शेतकरी व जनतेचा विरोध आहे. यासाठी दिल्लीत आजअखेर ८० दिवस आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे तालुक्यातील शेतकरी, व्यापारीवर्गाने बेळगाव-वेंगुर्ला महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सरपंच विष्ण गावडे-जंगमहट्टी, विलास पाटील, आनंद कांबळे, संदीप सकट, माजी सरपंच एकनाथ कांबळे -हलकर्णी, सरपंच दत्तू मुलीक -आंबेवाडी, सरपंच शिवाजी तुपारे -कारवे, जोतिबा गोरल, मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पाटील, बाबूराव पाटील, तानाजी गडकरी, मनोज रावराणे, रायमण फर्नांडिस आदी शेतकरी या अंदोलनात सहभागी झाले होते.
फोटो ओळी : पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे मागण्याचे निवेदन पोलीस निरीक्षकांना देताना सरपंच विष्णू गावडे, विलास पाटील, पिनू पाटील, आनंद कांबळे, रावराणे आदी.