मराठ्यांना आरक्षण मिळावे, पन्हाळ्यावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आणि मनोज जरांगे-पाटील यांच्या मारठा आरक्षण आंदोलनाला पाठिबा देण्यासाठी पन्हाळा तालुका सकल मराठा बांधवांच्यावतीने रविवारी (दि.२२) सकाळी वाघबीळ येथे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देऊन आरक्षणाबाबत सरकारच्या वेळकाढू धोरणाचा निषेध केला. पन्हाळा आणि कोडोली पोलिस ठाण्याकडून वाघबीळ फाट्यावर बंदोबस्त तैनात केला होता.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी जाफळे (ता.पन्हाळा) येथील वसंत पाटील आणि सुरेश जगदाळे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाकडे लक्ष वेदण्यासाठी रविवारी पन्हाळ्यातील सकल मराठा बांधवांनी वाघबीळ येथे रविवरी सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनमुळे कोल्हापूर, पन्हाळा, जोतिबा आणि रत्नागिरीकडे जाणारी वाहतुक अर्धा तास ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबपर्यत रांगा लागल्या होत्या. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत सकल बांधव आक्रमक झाले होते. पोलिसांच्या विनंतीनंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. त्यानंतर आंदोलकांनी पन्हाळ्यावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वाघबीळ ते पन्हाळा तहसील कार्यालयापर्यंत मोटरसायकलने रॅली काढत पांठिबा दिला.यावेळी माजी आमदार सत्यजीत पाटील, गोकुळचे संचालक चेतन नरके, शिवसेना तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, प्रदिप जाधव, अमर भोसले, चेतन भोसले, रविंद्र धडेल, रवी तोरसे, पन्हाळा पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड, उपनिरीक्षक बी.बी.मलगुडे आदींसह मराठा सकल समाजाचे बांधव उपस्थित होते.