कोल्हापूर : गेले महिनाभर किरकोळ बाजारात ७० रुपयांच्या आत आलेली हरभराडाळ काहीशी तेजीत आली आहे. पाडव्याच्या पार्श्वभूमीवर डाळीची मागणी वाढल्याने दर वधारला असून, मूग, मूगडाळीच्या दरांतही वाढ झाली आहे. भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे फळमार्केट चांगलेच तापले असून, हापूस आंब्यांची आवक वाढली आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने डाळींचे उत्पादन चांगले झाल्याने गेल्या दीड-दोन महिन्यांपासून तूर व हरभराडाळींच्या दरांत घसरण सुरू होती. ऐन हंगामात दोन्ही डाळी ७० रुपयांच्या आत आल्या होत्या; पण या आठवड्यात गुढीपाडव्याचा सणामुळे मागणी वाढली आणि दरात थोडी वाढ झाली. किरकोळ बाजारात प्रतिकिलो दोन रुपयांनी भाव वधारला असून, मूग व मूगडाळीच्या दरात मात्र दहा रुपयांची वाढ झाली आहे. सरकी तेलाचा दर स्थिर असून, किरकोळ बाजारात ७० रुपये, तर साखर ४० रुपयांवर स्थिर आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर आटा, पिठीच्या मागणीत वाढ झाली आहे. वांगी २५, ओला वाटाणा ४०, वरणा ४०, दोडका ५० रुपये किलो झाला आहे. टोमॅटोने काहीशी उचल खाल्ली आहे. काकडीची आवक वाढली असून, दरात घसरण झाली आहे. कोथिंबीर, मेथीची आवक स्थिर असल्याने दहा रुपयांना दोन पेंढ्या असा दर राहिला आहे. लिंबंूची मागणी वाढली असून, किरकोळ बाजारात दहा रुपयांना पाच लिंबू मिळत आहेत. चटणीच्या मिरची खरेदीसाठी अजूनही झुंबड आहे. ब्याडगी मिरचीचा साधारणत: १५० रुपयांपर्यंत दर आहे. ती तिखटाला थोडी कमी असल्याने त्यात ‘घंटूर’ मिरची मिसळली जाते, तिचा दर ८० रुपयांपासून पुढे आहे. हापूस आंब्यांची आवक व दरदामआंबाआवक दर रुपयांतहापूस३९४ पेटी५०० ते २२००हापूस४८०० बॉक्स१०० ते ७००पायरी५७ बॉक्स२५० ते ४००रायवळ९८१ पेटी५० ते १५०मद्रास२०० बॉक्स३०० ते ५००मद्रास पायरी२५० बॉक्स२५० ते ३००
हरभराडाळीचे दर तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2017 11:43 PM