शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

पर्यूषण पर्वानिमित्त रथयात्रेचे आयोजन-जैन बांधवांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 3:27 PM

रथयात्रा, बग्गी, पारंपरिक वाद्यपथक, भक्तिगीते आणि जैन बांधवांच्या उपस्थितीत पर्यूषण पर्व सांगता उत्सवानिमित्त बुधवारी रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. गुजरीतील श्री संभवनाथ जैन मंदिर, श्री वासूपूज्य, लक्ष्मीपुरीतील श्री मुनिसुव्रत, शाहूपुरीतील श्री शांतिनाथ, भक्तिपूजा नगरातील श्री आशापुरा अशा विविध जैन मंदिर ट्रस्टच्या वतीनेरथयात्रा काढण्यात आली.

ठळक मुद्देपर्यूषण पर्वानिमित्त रथयात्रेचे आयोजनजैन बांधवांचा सहभाग

कोल्हापूर : रथयात्रा, बग्गी, पारंपरिक वाद्यपथक, भक्तिगीते आणि जैन बांधवांच्या उपस्थितीत पर्यूषण पर्व सांगता उत्सवानिमित्त बुधवारी रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. गुजरीतील श्री संभवनाथ जैन मंदिर, श्री वासूपूज्य, लक्ष्मीपुरीतील श्री मुनिसुव्रत, शाहूपुरीतील श्री शांतिनाथ, भक्तिपूजा नगरातील श्री आशापुरा अशा विविध जैन मंदिर ट्रस्टच्या वतीनेरथयात्रा काढण्यात आली.पर्यूषण पर्वानिमित्त गेले आठ दिवस महावीर वाचन, महावीर स्वामींचा पाळणा, संवत्सरी प्रतीकमन व उपवास, कंठाभरतनम अठ्ठाई, महामृत्युंजयतप, आंचनील श्रेणीतप व मोक्ष दंडतप हे उपवास व आराधना सुरू होती. रोज गच्छाधिपती पुण्यपाल आचार्यदेव सूरीश्वरजी महाराज व आचार्यदेव महाराज, भूजनभूषण, आचार्य वज्रभूषण महाराज यांचे प्रवचन झाले.पर्यूषण पर्व सांगतानिमित्त या आचार्यांच्या उपस्थितीत बुधवारी शहरातील प्रमुख मार्गांवरून रथयात्रा काढण्यात आली. रथात भगवंतांची प्रतिकृती, तसेच देवी-देवतांची वेशभूषा धारण केलेले भक्त सहभागी झाले होते. गुजरी जैन मंदिर, महाद्वार रोड, भेंडे गल्ली, शिवाजी पुतळा, बिंदू चौक, लक्ष्मीपुरी, महाराणा प्रताप चौकमार्गे पुन्हा संभवनाथ जैन मंदिरात रथयात्रेची सांगता झाली. यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले.

यावेळी संभवनाथ भगवान ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल, अशोक केसरीमल, ईश्वर परमार, लीलाचंद ओसवाल, प्रदीप ओसवाल, भरत ओसवाल, माणिक जैन, राजेश धनराज, उत्तम मांगीलाल, रतन गुंदेशा, सुभाष गुंदेश, दिलीप रायगांधी यांच्यासह श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरkolhapurकोल्हापूर