प्रवीण देसाई --- कोल्हापूर --रेशन कार्डाच्या संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सर्व रेशन दुकानदारांना पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. उद्या, सोमवारी महाराष्ट्र दिनापासून या दुकानांमधून हाताच्या अंगठ्याच्या ठशाद्वारे (बायोमेट्रिक) ग्राहकांना धान्य मिळणार आहे. ज्यांनी आधार लिंकिंग केलेले नाही, अशा ग्राहकांना रेशनचे धान्य मिळणार नाही. पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात पॉस मशीन दाखल झाली. त्यानंतर सर्व रेशन दुकानदारांकडे ती सुपूर्द करून ती कशी हाताळायची, याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा कार्यक्रम पूर्ण झाला असून, प्रत्येक रेशन दुकानामध्ये हे मशीन बसविण्यात आले आहे. ही मशीन एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होऊन महिनाअखेरपर्यंत याचे काम सुरू राहिल्याने काही लाभार्थ्यांनाच या प्रणालीद्वारे धान्य मिळू शकले आहे; कारण बहुतांश दुकानांमधून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच ग्राहकांनी रेशनवरील धान्य खरेदी केले आहे. हाताच्या अंगठ्याच्या ठशाद्वारे धान्य वितरण होण्याच्या प्रक्रियेला उद्या, सोमवारपासून पूर्ण क्षमतेने सुरुवात होणार असल्याचे पुरवठा विभागाच्या सूत्रांकडून सांगितले.रेशन कार्डांचे संगणकीकरण करून त्या माध्यमातून लोकांना हाताच्या अंगठ्याच्या ठशा (थंब)द्वारे रेशनचे धान्य देण्याचा शासनाचा उद्देश आहे. त्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून युद्धपातळीवर काम सुरू आहे. त्यानुसार कागल व करवीर तालुक्यांतील प्रत्येकी एका गावाची प्रायोगिक तत्त्वावर निवड करून त्या ठिकाणी ही मशीन बसविण्यात आली. त्यानंतर सर्वच म्हणजे १३३६ रेशन दुकानांमध्ये ही मशीन बसविली आहेत. रेशन कार्डवरील आधार लिंकिंग झाले आहे, अशांनाच धान्य मिळणार असून, लिंकिंग केलेले नाही, त्यांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे.हाताच्या अंगठ्याच्या ठशाद्वारे धान्य वितरण प्रक्रियेला उद्या सोमवारपासून पूर्ण क्षमतेने सुरूवात होणार आहे.१कागल, करवीर तालुक्यातील प्रत्येकी एका गावात प्रायोगिक तत्त्वावर मशीन बसविली. त्यानंतर १३३६ रेशन दुकानांत मशीनबसविली आहेत. ‘पॉस मशीन’द्वारे रेशन कार्डधारकांना असे मिळेल धान्य प्राधान्यक्रम - प्रतिमाणसी पाच किलो धान्य (गहू तीन किलो व तांदूळ दोन किलो)प्राधान्यक्रम (उत्पन्न एक लाखाच्या आत असणारे) - प्रतिमाणसी पाच किलो धान्य (गहू तीन किलो व तांदूळ दोन किलो).अंत्योदय- प्रति रेशनकार्ड ३५ किलो धान्य (गहू २१ किलो व तांदूळ १४ किलो) व शुभ्र रेशनकार्डधारक मिळून सुमारे २ लाख १८ हजार ७०० व अंत्योदय रेशनकार्डधारक ५६ हजार ३०० असा समावेश आहे.जिल्ह्यातील रेशन दुकानेतालुकादुकाने कोल्हापूर शहर१६६करवीर१४८ शिरोळ१३८ शाहूवाडी१२७ राधानगरी११६ पन्हाळा१०६इचलकरंजी१०३ कागल९७ चंदगड१३७ आजरा८७ गडहिंग्लज९४गगनबावडा२३ भुदरगड९०
महाराष्ट्र दिनापासून ‘बायोमेट्रिक’वर शिधावाटप
By admin | Published: April 30, 2017 1:08 AM