प्रवीण देसाई - कोल्हापूर -सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा विषय नेहमीच चर्चेत राहिला आहे. वेळेवर धान्य न मिळणे, धान्याचा काळाबाजार , असे गैरप्रकार घडतात. यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने रेशनबाबत सर्व माहिती वेबसाईटच्या माध्यमातून आॅनलाईन उपलब्ध करून दिली आहे. प्रायोगिक तत्त्वावर याची सुुुरुवात झाली असून, लवकरच ती गतिमान होणार आहे.रेशन व्यवस्थेमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी व नागरिकांना या व्यवस्थेमधील इत्यंभूत माहिती मिळावी, यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. रेशनकार्डसह पुरवठा विभागाची माहिती आता आॅनलाईनद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस ही वेबसाईट कार्यान्वित केली आहे. या वेबसाईटवर जिल्हा पुरवठा विभागाला मंजूर होणारे नियतन (उदा. तांदूळ, गहू, रॉकेल) याची माहिती, त्याचबरोबर पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना किती धान्य व रॉकेल मंजूर झाले, याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी या वेबसाईटवर जाऊन आपण ज्या रेशन दुकानाचे ग्राहक आहोत, त्या दुकानाचे नाव सर्च केल्यावर त्यात किती धान्य आले आहे याची माहिती कळू शकते. त्यामुळे मंजूर नियतनाबाबत संबंधित दुकानदार लपवाछपवी अथवा उडवाउडवीची उत्तरे देऊ शकणार नाहीत. त्याचबरोबर रेशनकार्डवरील सर्व माहितीही येथे बघता येणार आहे.वेबसाईट...रेशन व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने ६६६.ेंाँंङ्मङ्म.िॅङ्म५.्रल्ल ही वेबसाईट सुरू केली आहे. आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस ती कार्यान्वित झाली आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर असणारी ही पथदर्शी योजना येत्या काळात गतिमान होणार आहे.
रेशनची माहिती आता ‘आॅनलाईन’
By admin | Published: November 10, 2015 11:34 PM