राधानगरी पुरवठा विभागाची कारवाई
सरवडे: नरतवडे,(ता. राधानगरी) येथील सरकारमान्य अभिनंदन रास्त भाव धान्य दुकानात काळ्या बाजाराने रेशनिंग धान्य विकण्याच्या उद्देशाने महिंद्रा पिकअप गाडीमध्ये भरताना राधानगरीचे पुरवठा अधिकारी जयवंत पोवार यांच्यासह नायब तहसीलदार विजय जाधव यांच्या पथकाने ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पकडून दुकान सील केले.
ऐन कोरोनाच्या महामारीच्या काळात रेशन दुकानचालकाचा काळाबाजारामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत होता.
नरतवडे येथे २०१३ पासून हिंदुराव रेपे हे सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकान चालवतात. गावामध्ये २९४ लाभार्थी आहेत.रेपे यांनी लाभार्थींना कमी धान्य देऊन उर्वरित धान्य ज्यादा दराने विक्रीसाठी पाठवत असल्याच्या तक्रारी होत्या,आज ग्रामस्थांना रेशनिंगचे धान्य विक्रीच्या उद्देशाने बाहेर नेत असल्याचे निदर्शनास येताच पुरवठा विभागाला कळवताच तत्काळ पुरवठा विभागाचे पथक दाखल झाले.यावेळी रेपे हे महिंद्रा पिकअप मालवाहतूक गाडीमध्ये शासकीय धान्य विक्रीस पाठवण्याच्या उद्देशाने भरताना राधानगरी पुरवठा विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले,यावेळी मालवाहतूक गाडीमध्ये पन्नास किलोप्रमाणे भरलेली तांदळाची सात आणि गव्हाची आठ पोत्यांच्या मालासह दुकान सील केलं आहे. चौकशीसाठी पिकअप गाडीसह चालकाला ताब्यात घेतले आहे. यावेळी नायब तहसीलदार विजय जाधव यांनी गावातील लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून तपासादरम्यान गावानजीकच्या रेशन दुकानाकडे गावचा रेशन धान्याचा कोटा देण्यात येणार असल्याचे सांगितले. ऐन कोरोनाच्या आपत्तीजनक परिस्थितीत रेशन दुकानचालकाने नागरिकांची लूट केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. यावेळी अशाप्रकारे रेशनिंग दुकानांमध्ये गैरप्रकार सुरू असल्यास पुरवठा विभागास संपर्क साधण्याचे आवाहन पुरवठा अधिकारी जयवंत पोवार यांनी केले आहे.
...........
फोटो - नरतवडे येथे रेशन धान्य दुकानावर कारवाई करताना राधानगरी तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी.
------------------------------------
सूचना- या बातमीत सरकारमान्य अभिनंदन रास्त भाव धान्य दुकान (अभिनंदन हे दुकानाचे नाव आहे काय? )