कोल्हापूर : शासनाने मे महिन्यात मोफत धान्य देण्याचा आदेश काढल्याने रेशन दुकानदारांनी भरलेली रक्कम परत मिळावी, मोफत धान्याचे कमिशन प्रति क्विंटल दीडशे रुपयेप्रमाणे लवकर मिळावे व दुकानदारांना विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार महासंघाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. त्यांनी कठीण काळात गोरगरिबांसाठी रेशन दुकानदारांनी केेलेल्या कामाचे कौतुक करत मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून मागण्याची पूर्तता करू, असे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या शिष्टमंडळाने रेशन दुकानदारांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिलपासून पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत मोफत धान्य वाटप करण्यात आले आहे, त्याचे मार्जिन मनी प्रति क्विंटल दीडशे रुपये प्रमाणे लवकर मिळावे, मे महिन्यातील धान्याची रक्कम परत मिळावी तसेच या आपत्कालीन स्थितीत धान्य वाटप करणाऱ्या दुकानदारांना विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी केली. यावेळी कागल तालुकाध्यक्ष संदीप लाटकर, अमोल शेंडगे,कृष्णात बनके, ज्ञानदेव पाटील, श्रीकांत कांबळे, जितेंद्र प्रभावळकर, शंकर घाटगे, मदन पाटील, जयवंत निकम उपस्थित होते.
---
फोटो नं २८०८२०२१-कोल-रेशन दुकानदार
ओळ : कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार महासंघाच्यावतीने शनिवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
---