शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

रेशन दुकानांत आता दुग्ध पदार्थ, खते, बियाणे, भाजीपालाही-गिरीष बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 1:29 AM

रेशन व्यवस्थेतील बायोमेट्रिक प्रणालीमुळे राज्यात सुमारे १२ लाख बोगस रेशनकार्ड मिळाली असून, ती तातडीने रद्द करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देराज्यातील १२ लाख बोगस रेशनकार्ड रद्द; तीन लाख ८० हजार टन धान्य वाचले; नव्या ९९ लाख लोकांना वाटप करणार

कोल्हापूर : रेशन व्यवस्थेतील बायोमेट्रिक प्रणालीमुळे राज्यात सुमारे १२ लाख बोगस रेशनकार्ड मिळाली असून, ती तातडीने रद्द करण्यात आली आहेत. त्यातून वाचलेले सुमारे तीन लाख ८० हजार मेट्रिक टन धान्य नवीन सुमारे ९९ लाख लोकांना वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी रेशन दुकानातून आता धान्याबरोबरच आरे कंपनीची दूध उत्पादने, खते, बी-बियाणे, भाजीपाला, उज्ज्वला गॅसचे सिलिंडर या वस्तू विकण्यास परवानगी देण्यात आल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री बापट बोलत होते.

ते म्हणाले, राज्यातील रेशन दुकानदारांच्या अनेक अडचणीतून मार्ग काढला आहे. त्यासाठी रेशन दुकानात सात गोष्टी ठेवण्याची परवानगी दिली आहे; पण कीटकनाशक ठेवण्यास प्रतिबंध केला आहे. रेशन दुकानदारांचा वारसा हक्काचा प्रश्नही निकाली काढला आहे. त्यासाठी रेशन दुकानधारकांना सुनावणीसाठी मुंबईला फेऱ्या माराव्या लागत होत्या. आता या सुनावण्या ज्या-त्या जिल्ह्यांत निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे. यातून राज्यात आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार प्रकरणे निकाली काढली आहेत.गोदामातून टेम्पो थेट दुकानातचरेशनप्रणालीमध्ये पूर्ण पारदर्शी व्यवहार ठेवण्याचा जास्तीत-जास्त प्रयत्न केला आहे. धान्याच्या गोदामातून धान्य भरून गेलेला टेम्पो थेट रेशन दुकानामध्येच जाईल याची पूर्णपणे दक्षता घेण्यात आली आहे. त्यासाठी राज्यामध्ये वर्षअखेरपर्यंत पुरवठा खात्याची सुमारे २६५ गोदामे पूर्ण होतील. पुरवठा विभागात आमूलाग्र बदल करून कार्यप्रणाली आधुनिक केली आहे. त्यामध्ये गोदामातून धान्य घेऊन जाणारा टेम्पो कोठे थांबतो, हे सहजपणे समजू शकते. शिवाय दुकानदारांना आता आॅनलाईन पेमेंट करता येते.जिल्ह्यात ९४ हजार नवीन लोकांना धान्य मिळणारराज्यात १२ लाख बोगस रेशनकार्ड रद्द केल्यानंतर बचत झालेले धान्य हे नवीन ९९ लाख लोकांना वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ९४ हजार नवीन लोकांना लाभ होणार आहे. त्यामध्ये शहरातील सुमारे ६५ हजार, तर ग्रामीण भागातील २९ हजार लोकांचा समावेश आहे.मका १४ रुपये खरेदी, रुपयाने विक्री1 रेशन दुकानात मिळणाºया मकाबाबत बोलताना मंत्री बापट म्हणाले, सुमारे १४ रुपये प्रतिकिलो रुपये दराने शासन खरेदी करून ते रेशनवर प्रतिकिलो १ रुपये दराने देत आहे. मका न घेतल्यास गहू व तांदूळ मिळणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मकाऐवजी ज्वारी देण्याचाही प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.2 रॉकेल विक्रेत्यांकडे गॅस एजन्सी देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील १०० टक्के रेशन दुकानांमध्ये ई-पॉस मशीन देण्यात आले असून, त्या मशीनबाबत दुकानदारांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. काही डोंगराळ भागात मशीनला रेंज नसल्यामुळे तेथे पावती करण्यास परवानगी दिली आहे. सर्वांगीण विकास आणि दुकानदारांना मदत करणे, हाच हेतू बायोमेट्रिक प्रणालीचा आहे.जादा तूरडाळ इतर राज्यांतराज्यात यंदा तूरडाळीचे उत्पादन जादा झाले आहे. गोदाममालकांचे सुमारे १९ कोटी रुपये देणी भागविल्यानंतर ती तूरडाळ आता गोदामात सुरक्षित ठेवली आहे. जादा तूरडाळ ठेवण्यास जागा शिल्लक नाही अशी इतर राज्यांत पाठविली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgirish bapatगिरीष बापट