श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक सलग पाचव्यांदा बिनविरोध पार पडली. स्थापनेपासूनच सर्व निवडणुका बिनविरोध करून संस्थेच्या सभासदांनी सहकारात नवा आदर्श निर्माण केला आहे.
गडहिंग्लजचे सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी विलास जाधव यांनी संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत निवडणुकीचा निकाल जाहीर केला.
नवनिर्वाचित संचालक मंडळात संस्थापक-अध्यक्ष एम. एल. चौगुले, उपाध्यक्ष प्रा. वासुदेव मायदेव, संचालक प्राचार्य रामचंद्र निळपणकर, प्रा. किरण पोतदार, सुशांत करोशे व प्रा. विजयकुमार घुगरी, प्रा. विजय आरबोळे, डॉ. संजय चौगुले, महेश मजती, प्रा. दत्ता पाटील, प्रा. मनोहर पुजारी, मीना रिंगणे व उमा तोरगल्ली यांचा समावेश आहे.
निवडणूक बिनविरोध पार पाडल्याबद्दल संस्थापक-अध्यक्ष चौगुले यांनी सभासदांचे आभार मानले. सभासदांतर्फे प्रा. सरला आरबोळे यांनी नूतन संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी सहायक निवडणूक अधिकारी रमेश चव्हाण, आजी-माजी संचालक व सल्लागार, सभासद, सीईओ दत्तात्रय मायदेव, व्यवस्थापक शिवानंद घुगरे, प्रशासन अधिकारी सागर माने व कर्मचारी उपस्थित होते.
---------------------------------------
* ७ नव्या चेहऱ्यांना संधी
नवनिर्वाचित संचालक मंडळात ६ विद्यमान संचालकांना पुन्हा संधी मिळाली असून, ७ नव्या चेहऱ्यांचा समावेश केला आहे. त्यांना निवडणूक अधिकारी जाधव यांच्याहस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.
---------------------------------------
* मल्लाप्पाण्णा चौगुले : २९१२२०२०-गड-०१
* वासुदेव मायदेव : २९१२२०२०-गड-०२
* विजय आरबोळे : २९१२२०२०-गड-०३
* संजय चौगुले : २९१२२०२०-गड-०४
* विजयकुमार घुगरे : २९१२२०२०-गड-०५
* सुशांत करोशे : २९१२२०२०-गड-०६
* महेश मजती : २९१२२०२०-गड-०७
* रामचंद्र निळपणकर : २९१२२०२०-गड-०८
* दत्तात्रय पाटील : २९१२२०२०-गड-०९
* किरण पोतदार : २९१२२०२०-गड-१०
* मीना रिंगणे : २९१२२०२०-गड-११
* उमा तोरगल्ली : २९१२२०२०-गड-१२
* मनोहर पुजारी : २९१२२०२०-गड-१३