शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

'रवळनाथ'च्या ठेवीत ५५ कोटींनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:21 AM

गडहिंग्लज : गेल्या आर्थिक वर्षात श्री रवळनाथ को-ऑप. हाउसिंग फायनान्स सोसायटीच्या ठेवीमध्ये ५५ कोटींनी वाढ झाली. ३१ मार्च २०२१ ...

गडहिंग्लज :

गेल्या आर्थिक वर्षात श्री रवळनाथ को-ऑप. हाउसिंग फायनान्स सोसायटीच्या ठेवीमध्ये ५५ कोटींनी वाढ झाली. ३१ मार्च २०२१ अखेर संस्थेत ३११ कोटींच्या ठेवी आहेत. कोरोनाच्या सावटाखाली या वर्षातदेखील संस्थेची कामगिरी नेहमीप्रमाणेच उत्तम राहिली आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली.

चौगुले म्हणाले, ३१ मार्चअखेर संस्थेची सभासद संख्या ८०६३ आहे. एकूण ठेवी ३११ कोटी तर २१९ कोटींची कर्जे आहेत. खेळते भांडवल ३४६ कोटींचे असून, एकूण गुंतवणूक १११ कोटींची आहे. ५३० कोटींचा वार्षिक व्यवसाय तर १ कोटी ४० लाखाचा निव्वळ नफा झाला आहे.

गडहिंग्लजमध्ये संस्थेची स्व:मालकीची प्रधान कार्यालय इमारत असून, ९ पैकी गडहिंग्लज, कोल्हापूर, जयसिंगपूर कुडाळ या शाखा स्व:मालकीच्या इमारतीत आहेत. गेल्या वर्षी ठेवी संकलन व कर्ज वितरणात बेळगाव शाखेने आघाडी मारली आहे.

संस्थेची वेबसाईट असून, त्यावर वार्षिक अहवालासह ताज्या घडामोडींची माहिती दिली जाते. सध्या एसएमएस बँकींग, सीबीएस, मायक्रो एटीएम, डेबिट कार्ड व नॅशनल अ‍ॅटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (नॅच) ही सेवा उपलब्ध आहे.

संस्थेच्या प्रगतीसाठी उपाध्यक्ष वासुदेव मायदेव, सीईओ दत्तात्रय मायदेव, व्यवस्थापक शिवानंद घुगरे, सर्व संचालक, शाखाध्यक्ष, सल्लागार, शाखाधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले, असेही चौगुले यांनी सांगितले.

-----------------------

* * * * * * * * * * * * * * * * * * * *दोन वेतनवाढी

कर्मचाऱ्यांना दोन वेतनवाढी

कोरोनामुळे संस्था आर्थिक अडचणीत येऊ नये म्हणून कर्मऱ्यांनी गेल्या वर्षात २० टक्के महागाई भत्ता आणि वेतनवाढ स्वेच्छेने नाकारला होता; परंतु त्यांच्याच कष्टामुळे संस्थेची यशस्वी घोडदौड कायम राहिल्यामुळे यावर्षी त्यांना दोन वेतनवाढी आणि २० टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याचे चौगुले यांनी सांगितले.

-----------------------

* एम. एल. चौगुले : ०५०४२०२१-गड-०४