शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

गोकुळ उत्पादन विक्री ठेक्याचा आरोप खोटा, बिनबुडाचा : रवींद्र आपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 10:27 AM

कोल्हापूर : पुणे येथील गोकुळ दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीचा ठेका एकाच व्यक्तीला दिला आहे, हा आरोप धादांत खोटा ...

ठळक मुद्देगोकुळ उत्पादन विक्री ठेक्याचा आरोप खोटा, बिनबुडाचा : रवींद्र आपटेविरोधकांनी माहिती घेऊनच ‘गोकुळ’वर बोलावे

कोल्हापूर : पुणे येथील गोकुळ दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीचा ठेका एकाच व्यक्तीला दिला आहे, हा आरोप धादांत खोटा आणि बिनबुडाचा आहे, असा खुलासा ‘गोकुळ’चे चेअरमन रवींद्र आपटे यांनी केला आहे. विरोधकांनी ‘गोकुळ’सारख्या संस्थेवर बोलताना किमान माहिती घेऊन बोलावे, असा टोलाही त्यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला आहे.चार दिवसांपूर्वी कोल्हापुरात झालेल्या एका बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’चे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी हप्ते दिल्यासारखा पुण्यातील एकाच कंपनीकडे ठेका का दिला आहे, असा आरोप केला होता. यावर मंगळवारी ‘गोकुळ’तर्फे निवेदन प्रसिद्धीस देऊन या आरोपांना उत्तर देण्यात आले.चेअरमन रवींद्र आपटे यांनी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, पुणे शहर व विभागाकडे ‘गोकुळ’चे दररोज सरासरी दोन लाख ३० हजार लिटर दूध आणि महिन्याला साधारणपणे ३२ टन दुग्धजन्य पदार्थांची विक्री होते. यासाठी गेली अनेक वर्षे पुणे विभागात दुधासाठी १० वितरक आणि दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीसाठी चार सुपर स्टॉकिस्ट आणि २९ वितरक आणि त्यांच्या माध्यमातून शेकडो किरकोळ विक्रेत्यांचे जाळे कार्यरत आहे. यामध्ये दिवसेंदिवस नवीन वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांची भर पडत आहे.कोणताही दूध संघ हा गुणवत्ता टिकविण्यासाठी आणि सुलभ वितरण व्यवस्था याकरिता मध्यवर्ती आणि एकच पॅकेज युनिट निर्माण करतो. गेली अनेक वर्षे पुण्याची विक्री अगदी पाच-सात हजार असल्यापासून ‘गोकुळ’चेही पॅकेजिंग युनिट एकच आहे.

हळूहळू विक्री वाढेल त्याप्रमाणे पॅकेजिंग युनिटचा विस्तार वाढत गेला आहे. मात्र विक्रीसाठी गेल्या अनेक वर्षांत अनेक वितरकांच्या माध्यमातून स्वतंत्र आणि विस्तृत यंत्रणा दूध संघाने उभी केली आहे. याची सर्व माहिती संघाच्या मार्केटिंग विभागाकडे केव्हाही उपलब्ध होऊ शकते, असेही आपटे यांनी स्पष्ट केले आहे. लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार सर्वांना आहे; पण विरोधकांनी ‘गोकुळ’सारख्या संस्थेविषयी बोलताना किमान माहिती घेऊन बोलणे अपेक्षित आहे, असा टोलाही आपटे यांनी लगावला आहे.विरोधकांकडून काल्पनिक माहितीच्या आधारावर आरोपसंघाने कोणत्याही एका व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे ‘गोकुळ’च्या उत्पादन, विक्रीचा ठेका दिलेला नाही. फक्त राजकीय हेतूने, निव्वळ खोटे आरोप करायचे म्हणून विरोधक पत्रकार परिषद घेऊन काल्पनिक माहिती देऊन दूध उत्पादक शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांमध्ये संघाविषयी गैरसमज निर्माण करीत आहेत, असा आरोपही आपटे यांनी केला. 

 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर