कोल्हापूर : येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौंड्री मेन (आयआयएफ) कोल्हापूर चॅॅप्टरच्या अध्यक्षपदी रवींद्र पाटील (मेटलसॉफ्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, शिरोली) यांची, तर उपाध्यक्षपदी समीर पाटील (समीर कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड, गोकुळ शिरगाव) यांची निवड झाली. नूतन अध्यक्ष पाटील यांनी गेल्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयआयएफ कोल्हापूर चॅॅप्टरच्या संचालकांची सभा मंगळवारी ऑनलाईन झाली. त्यामध्ये सन २०२१-२२ यावर्षासाठी चॅॅप्टरच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. चॅॅप्टरच्या सचिवपदी विनय खोबरे (शकुंतला स्टील्स, गोकुळ शिरगाव), खजिनदारपदी शरद तोतला (शगुन कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड, शिरोली) यांची निवड झाली. या ऑनलाईन सभेत ‘आयआयएफ’चे संचालक राजीव पारीख, सुरजितसिंग पवार, एम. बी. शेख, सुमित चौगुले, दिपांकर विश्वास, सुरेश चौगुले, महेश दाते, संजय पाटील, संतोष रंगरेज आदी सहभागी झाले. माजी अध्यक्ष सुमित चौगुले यांनी नवीन अध्यक्षांच्या नावाला अनुमोदन दिले.
प्रतिक्रिया
आयआयएफ कोल्हापूरच्या आतापर्यंतच्या अध्यक्षांनी राबविलेले उपक्रम, सुरू केलेल्या योजनांमध्ये योगदान देणार आहे. त्यासह कच्चामाल, नवीन दर निश्चिती आदी प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
-रवींद्र पाटील
फोटो (०४०६२०२१-कोल-आयआयएफ कोल्हापूर)
===Photopath===
040621\04kol_7_04062021_5.jpg
===Caption===
फोटो (०४०६२०२१-कोल-आयआयएफ कोल्हापूर)