कच्चा माल भरलेल्या ट्रकला लागलेली आग ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे विझविण्यात आली. या घटनेची करवीर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, दानेवाडी (ता. पन्हाळा) येथील बाजीराव आनंदा कदम यांचे पडवळवाडी येथील गुजरणीच्या पाणंदीत पशुखाद्यासाठी लागणाऱ्या कच्चा माल साठवणुकीचे गोडावून आहे. गोडीवूनमध्ये कोंडा, भुस्सा आणि कणींनी भरलेली २५० मेट्रिक टनाचे पोती, बारदान, फर्निचर साहित्य आणि गोडावूनचे साहित्य आगीत जळून ४० लाखांचे नुकसान झाले. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास गोडावूनच्या मध्यभागातून अचानक आग लागली. तिथे रखवालीसाठी असणाऱ्या रमेश निकम यांनी लागलेल्या आगीचे लोट पाहून आरडाओरड केला. त्यानंतर ग्रामस्थ गोळा झाले. तोपर्यंत वाऱ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते.
आग विझविण्यासाठी कोल्हापूर येथून आग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आली होते. अग्निशमनचे कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने तब्बल चार तास आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मंगळवारी सांयकाळपर्यंत गोडावूनमधून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. गोडावूनच्या शेजारी मालाने भरलेला ट्रकाला मागील बाजूने आग लागली होती. ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत आग लागलेली पोती बाहेर ओढून आगीत पेटणाऱ्या ट्रकला वाचविले. गोडावूनमधून मंगळवारी कच्च्या मालाचा पहिलाच ट्रक भरून जाणार होता. तोपर्यंत शाॅर्टसर्किटच्या आगीने संपूर्ण गोडावून गिळंकृत केले.
२९ आग