शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सरसकट कर्जमाफीसाठी पुन्हा जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2017 6:29 PM

शेतकऱ्यांची मागणी : थकीत निकष लावल्यास नियमित परतफेड करणाऱ्यांचे काय?

सरसकट कर्जमाफीसाठी पुन्हा जोरशेतकऱ्यांची मागणी : थकीत निकष लावल्यास नियमित परतफेड करणाऱ्यांचे काय?कोल्हापूर : राज्य सरकारच्या पातळीवर कर्जमाफीच्या हालचाली गतिमान झाल्यानंतर कर्जमाफीचे निकष कोणते हा मुद्दा पुढे येऊ लागला आहे. केवळ थकबाकीदार शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली तर प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केलेल्यांनी चूक केली का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून, सरसकट कर्जमाफीसाठी जोर वाढू लागला आहे. तसे केले नाही तर २००९ ला केंद्र सरकारच्या कर्जमाफीनंतर कॉँग्रेसबद्दल जो रोष निर्माण झाला, तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. विरोधी कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेससह सत्तारूढ शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना कर्जमाफीबाबत आक्रमक झाली आहे. कर्जमाफीचा निर्णय होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू न देण्याचा इशारा थेट उद्धव ठाकरे यांनी दिल्याने सरकारची कोंडी झाली आहे. कर्जमाफीबाबत सरकारला काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे. त्या दृष्टीने हालचाली गतिमान झाल्या असून, सहकार आयुक्तांनी थकीत कर्जांची माहिती मागविली आहे. कॉँग्रेस सरकारने २००८ पूर्वीची कर्जमाफी केली होती; त्यामुळे २००९ नंतर थकीत कर्ज माफ करण्याचे सरकारचे नियोजन दिसते; पण केवळ थकबाकीदारांना कर्जमाफी दिली, तर ओढूनताणून कर्जाची परतफेड करणाऱ्यांचे काय? असा प्रश्न निर्माण होतो. मागील कर्जमाफीत असेच झाले आणि नंतर राज्य सरकारला सरसकट वीस हजार रुपये कर्जमाफी द्यावी लागली. तसे न करता कालावधी निश्चित करून तिथपर्यंत थकीत कर्जाबरोबर येणे बाकी माफ करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. ---------------------------------------------कर्जमंजुरीचा निकष महत्त्वाचाकर्जमंजुरी मर्यादेचा निकष मागील कर्जमाफीत नसल्याने गोंधळ निर्माण झाला. त्यामुळेच कर्जमाफीचे भिजत घोंगडे आजपर्यंत राहिले आहे. या गोंधळानंतर ‘नाबार्ड’ने कर्जवाटप करताना ‘क. म.’पाहूनच केल्याने या वेळेला विकास संस्थांना मोकळीक दिलेली नाही. आॅक्टोबर २०१६ अखेर खात्यावर असणारी येणे बाकी पूर्णपणे माफ केली तर संस्थाही फेरफार करू शकणार नाही; परिणामी बोगसगिरीला चाप बसू शकतो. ------------------------------------------------------------शेतीपूरक कर्जमाफीचीही मागणी केवळ पीककर्जामुळे शेतकरी अडचणी आला असे म्हणणे चुकीचे आहे. शेतीपूरक पाईपलाईन, ठिबक सिंचन, ग्रीन हाऊस, आदी कर्जेही थकली आहेत. त्यांचाही प्राधान्याने विचार व्हावा, अशी मागणी होत आहे. -------------------------------------------काय असावेत निकष : कर्जमर्यादेप्रमाणे ३१ आॅक्टोबर २०१६ अखेर येणेबाकी माफशेती आनुषंगिक कर्ज म्हणून काढलेली ‘खावटी’ कर्जेही माफ करावीत.शेतीपूरक व्यवसायांसाठी काढलेली मध्यम मुदत कर्ज खात्यावरील येणेबाकी माफ करावी. --------------------------------------------------------------------शेतकरी केवळ पीककर्जच घेतो हा सरकारचा गैरसमज आहे. पीककर्जासोबत शेतीपूरक व्यवसायासाठी काढलेली कर्जेही माफ केली पाहिजेत. - बाबासाहेब देवकर (माजी सदस्य, जिल्हा परिषद)