या उन्हाळी सत्रातील परीक्षा दि. १० ऑगस्टपासून सुरू झाल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणामुळे या परीक्षा संपेपर्यंत पेपर देता आला नाही. त्यामध्ये बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी. आदी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. दरम्यान, परीक्षा मंडळाने सोमवारी एकूण १५ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल ऑनलाईन जाहीर केले. त्यात बी. टेक., बी. कॉम. आय. टी., बी. टेक्सटाईल., बी. एस्सी. फूड टेक., एम. ए. वुमेन स्टडीज, बी. कॉम. बँक मँनेजमेंट, बी. व्होक. रिटेल मँनेजमेंट, बी. एस्सी. फूड टेक., एलएलबी थ्री ईअर लॉ पॅटर्न, आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. बी.ए., बी. कॉम., एम. ए., एम. कॉम., एम.जे., बी.व्होक,आदी सतरा अभ्यासक्रमांच्या एकूण १५११८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. त्यासाठी एकूण १५७३५ जणांनी नोंदणी केली होती. ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा अद्याप सुरू झालेली नाही. त्यांनी सराव चाचणी (मॉक टेस्ट) द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी केले.
तांत्रिक अडचण आलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:30 AM