अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून पांढऱ्या पट्ट्यातील गावांना त्यांनी हरित क्रांती करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. उसाचे प्रमाण मुबलक आहे आणि त्यामुळेच त्यांनी अन्नपूर्णा साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे.
मुश्रीफ पुढे म्हणाले, जगा आणि जगू द्या. या तत्त्वाने मी राजकारण केले आहे. त्यामुळे अन्नपूर्णासाठी लागेल ते सहकार्य करण्याची माझी तयारी आहे. संजय बाबांना सामान्य माणसाबद्दल अतिशय कनवाळूपणा आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी केलेले भरीव काम त्यांच्या कामाची पोहोचपावती ठरेल. आम्ही दोघेही छत्रपती शाहू साखर कारखान्याचे माजी संचालक होतो. त्यामुळे साखर कारखानदारीचा अनुभव आम्हाला आहे. अजून त्यांना काही अडचण वाटत असल्यास जरूर सहकार्य केले जाईल. मी आणि बाबा कॉलेजच्या एका क्रिकेट टीममध्ये एकत्र खेळलो आहेत. त्यामुळे राजकारणातही आमची खिलाडूवृत्ती असणार आहे. विकासाच्या बाबतीत आम्ही कधीही राजकारण करणार नाही.
नवीन होऊ घातलेल्या अन्नपूर्णा साखर कारखान्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा!