महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर असलेल्या कागलमध्ये आशियाई महामार्ग १४७ अडवून नव्याने झालेल्या आरटीओ तपासणी नाक्यातच जिल्ह्यात येणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. येथे १५ पोलीस कर्मचारी दोन शिफ्टमध्ये रात्रं-दिवस पहारा देत आहेत. मालवाहतूक व एमआयडीसी कामगारांना अडविले जात नाही. कोल्हापुरातील वाहनांना विचारणा करून खात्री झाल्यानंतरच सोडले अन्यथा परत पाठवले जात असल्याचे दिसले. परजिल्हा व परराज्यातील वाहनांना तर फारच अत्यावश्यक कारण असेल तरच सोडले जात आहे. ओळखपत्र तपासले जात आहे; पण अजूनही नागरिकांकडे ई पास नसल्याचे निदर्शनास आले.
२५०४२०२१-कोल-कागल ०१, ०२, ०३, ०४
फोटो : कागलमधील या आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यावर येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी केली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांची अशाप्रकारे ओळखपत्र पाहून, कारणाची खात्री पटल्यावरच सोडले जात आहे.
शाहू नाक्यावर कडा पहारा, दंडाची वसुली
दक्षिणेकडून शहरात प्रवेश करणाऱ्या शाहू नाक्यावरही १२ पोलिसांचा रात्रंदिवस बंदोबस्त आहे. त्यांच्या दिमतीला ट्रॅफिक पोलीस व महापालिका केएमटीचे कर्मचारीही आहेत. येथे सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, दुचाकी व चारचाकी चालकांना पूर्ण चौकशी करूनच शहरात प्रवेश दिला जात आहे. बरेच जण मेडिकल व दवाखान्याचे नाव सांगण्याची हुशारी करत होते; पण पोलीसही लगेचच डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन व अपाॅइंटमेंटची विचारणा करत होते. सबळ पुरावा दिला नाही म्हणून लगेच वाहनेही काढून घेतली जात होती. दंडाच्या पावत्या फाडल्या जात होत्या.
फोटो:२५०४२०२१-कोल-शाहू नाका ०१, ०२, ०३, ०४
फोटो ओळ : शाहू जकात नाक्यावर वाहनांची कसून चौकशी करूनच त्यांना पुढे मार्गस्थ केले जात आहे. अशाप्रकारे पोलिसांचा तेथे सशस्त्र पहारा दिसत आहे. विनापास येणाऱ्यांकडून दंडाची वसुलीही केली जात आहे.
(छाया : नसीर अत्तार)