महापालिकेचे एकूण कर्मचारी : ३,५००
महापालिका मुख्य इमारतीतील कर्मचारी : ५००
चौकट
पाच दिवसांचा अठवडा केल्यापासून कोल्हापूर महापालिकेची कामकाजाची वेळ शिपाईसाठी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३०, तर इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत आहे. कोरोनामुळे बायोमेट्रिक मशीन बंद आहेत. त्यामुळे सुट्टीनंतरच्या दुसऱ्या दिवशी असो व इतर वेळी येथील बहुतांश अधिकाऱ्यांसह कर्मचारीही वेळेवर हजर राहात नसल्याचे समोर आले आहे. सोमवारी रिॲलिटी चेक दरम्यान सुमारे १०० कर्मचारी उशिरा आल्याचे दिसून आले.
चौक़ट
सुट्टी दिवशीही कामावर
कोल्हापूर महापालिकेकडून गेले सलग ८६ रविवार शहरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. सुट्टी असूनही अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत उपस्थित असतात. येथील बहुतांश कर्मचाऱ्यांनी कोरोनामध्ये जिवाची पर्वा न करता सलग सहा महिने एकही दिवस सुट्टी न घेता काम केले असून, ही बाब महत्त्वाची आहे.
प्रतिक्रिया
लेटकमर कर्मचाऱ्यांवर महापालिका प्रशासन सक्तीने कारवाई करते. तीन दिवस उशिरा आल्यास त्यांची एक दिवसाची रजा रद्द (कपात) केली जाते. कामाच्या वेळेत इतरत्र जात असल्यास त्यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली आहे. सोमवारी लेटकमर आलेल्यांवरही याच नियमाने कारवाई होईल.
निखिल मोरे, उपायुक्त, कोल्हापूर महापालिका
फोटो : २८१२२०२० कोल केएमसी विशेष न्यूज१
ओळी : तीन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी काेल्हापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांची कार्यालयात जाण्यासाठी धावपळ सुरु होती. प्रवेशद्वाराजवळ थर्मल टेस्ट करून आणि सॅनिटायझर लावूनच प्रवेश दिला जात होता.
फोटो : २८१२२०२० कोल केएमसी विशेष न्यूज२
ओळी : कोल्हापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा लेखाजोखा ठेवणाऱ्या आस्थापना विभागातच सकाळी १० वाजले तरी खुर्च्या रिकाम्या होत्या.
छायाचित्र : नसीर अत्तार