गणपती कोळी -कुरुंदवाड - उसाच्या पाल्याचा उपयोग इंधनासाठी केला जात आहे. बगॅसच्या वाढलेल्या दरांमुळे बॉयलर असलेल्या औद्योगिक कारखान्यांना इंधनासाठी मोठी किंमत मोजावी लागत होती. मात्र, तुटलेल्या उसाचा पाला गट्टे करून बॉयलरला वापरणे सोपे झाल्याने औद्योगिक कारखान्यासाठी उसाचा पाला बगॅसला पर्याय ठरला आहे, तर शेतातील पाला विनाखर्चिक उचलला जात असल्याने पाला कुजविणे अथवा पेटविण्यासाठी अडचणीचे ठरलेल्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.मोठे-मोठ्या कारखान्यांत बॉयलरसाठी लाकूड, साखर कारखान्यांतील बगॅसचा वापर केला जातो. लाकडाचे दर गगनाला भिडल्याने औद्योगिक कारखान्यात बगॅसचा सर्रास वापर केला जात आहे. सध्या बगॅसचा दर प्रति टन २५०० रुपये आहे. तसेच ऊस गाळपाचा सिझन संपल्यानंतरही बगॅसचा दरही वाढतो. मात्र, पर्याय नसल्याने कारखानदारांना ते घ्यावे लागते. शिवाय ऊस गाळपाच्या हंगाममध्ये बगॅसचा दर कमी असला तरी त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने वजनातही घट येते. त्यामुळे उष्णता निर्माण होण्यासही कारखानदारांना त्रासदायक ठरते. बगॅसला पर्याय म्हणून उसाच्या पाल्याचा उपयोग केला जात आहे. उसाचा पाला वाळलेला असल्याने उष्णताही जास्त प्रमाणात निर्माण होते. कमी खर्चात जास्त उष्णता निर्माण करणारे इंधन मिळत असल्याने कारखानदार उसाच्या पाल्यालाच पसंती देत आहेत. या पाल्याचे दोन बाय तीन साईजचे गठ्ठे करून पोहोच करणारे व्यावसायिकही त्यामध्ये उतरल्याने कारखानदारांना सोयीचे ठरत आहे.बहुतेक शेतकरी उसाचा पाला जाळतात. पाला जाळल्याने शेतातील जीवाणूही नष्ट होतात. शेजारच्या उभ्या उसालाही आग लागण्याची शक्यता असते. अडचणीच्या शेतकऱ्यांना व्यावसायिकांकडून विनाखर्चिक शेतातील पाला उचलला जात असल्याने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.
उसाचा पाला ठरतोय बगॅसला पर्याय
By admin | Published: February 05, 2015 11:16 PM