कोल्हापूर : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे आहे. त्यांनी पूरपरिस्थिती निर्माण होण्यापूर्वीपासून महापूर येईपर्यंत वेळोवेळी वाढणाºया व धोक्याच्या पाणीपातळीवर लक्ष ठेवून त्या-त्यावेळी करावे लागणारे मदतकार्य करून पूरग्रस्तांसह नागरिकांनाही आधार देण्याचे काम देवदूत म्हणून केले.
महापुराने त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयही सोडले नाही. त्यांच्या दालनात चार फूट पुराचे पाणी घुसल्याने हातातील पेन, मोबाईल इतकेच साहित्य घेऊन ते सहकाºयांसोबत बाहेर पडून जिल्हा परिषदेत गेले. तेथून त्यांनी २४ तास थांबून प्रसंगी कर्मचाºयांच्याच डब्यातील भाजी-चपाती खाऊन काम सुरू ठेवले. लष्कर, नौदल, एनडीआरएफ येण्यापूर्वी जिल्हा या आपत्ती व्यवस्थापनाकडे उपलब्ध असणाºया बोटींसह इतर बचावकार्याच्या साहित्याच्या माध्यमातून मदतकार्य सुरू ठेवले.