पन्हाळा : स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये देशात पाचवा आणि पश्चिम विभागात पहिला क्रमांक आल्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पन्हाळा नगरपरिषदेचा सत्कार करण्यात आला. मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायत यांचा आढावा शुक्रवारी सर्किट हाऊस येथे घेतला. यावेळी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ मध्ये संपूर्ण देशात पाचवा आणि पश्चिम विभागात पहिला क्रमांक पटकावून उज्ज्वल यश संपादित केल्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नगरपरिषद पन्हाळाच्या नगराध्यक्षा रूपाली रवींद्र धडेल व मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी दौलत देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते. शिंदे यांनी यावेळी पन्हाळाच्या प्रलंबित लाईट अँड साउंड शोच्या प्रकल्पासाठी लवकरच निधी देण्याचे आश्वासन दिले.
फोटो-------
कोल्हापुरातील सर्किट हाऊस येथे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना नगराध्यक्षा रूपाली धडेल व मुख्याधिकारी स्वरूप खारगे.
०८ शिंदे पन्हाळा सत्कार