कोल्हापूर : पाणी म्हणजे जीवन याचे महत्त्व नागरिकांना पटू लागले आहे. त्यासाठी विविध माध्यमांतून पाणीबचतीच्या संकल्पना पुढे येऊ लागल्या आहेत. इमारतीच्या गच्चीवर जमा होणारे पावसाचे पाणी वाया न घालविता ते एका हौदात साठवून ते रिबोअरसाठी मुरवून वापरले जात आहे. अशा पद्धतीने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा प्रकल्प येथील मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलामध्ये करून त्यांनीही इतर समाजसेवेबरोबरच पाणीबचतीचा नवा मार्ग सांगितला आहे.सध्या महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना पाण्याचे महत्त्व किती, याची जाणीव मानवाला होऊ लागली आहे. ‘पाणी मुरवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना जरी शासनाने आणली असली तरीही शासनाच्या कोणत्याही योजनेची वाट न पाहता आपल्या घरातील सांडपाणी, पावसाचे जमा होणारे पाणी, आदी विविध मार्गांनी उपलब्ध होणारे पाणी जमिनीत मुरविण्याबाबत प्रबोधनाची गरज निर्माण झालेली आहे. सध्या भूगर्भातील पाणीपातळी कमालीची खालावली असताना ज्या भागात पाणी जिरविण्याचे तंत्र पूर्वीपासून अवलंबिले आहे. तेथे मात्र भूगर्भातील पाणीपातळी जादा असल्याचे दिसून आले आहे. कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटनाच्या ‘बालकल्याण संकुल’ मध्येही पाणीबचतीचा मार्ग अवलंबला आहे. याच बालकल्याण संकुलामध्ये यापूर्वी वाया जाणाऱ्या अन्नापासून खतनिर्मिती व बायोगॅस निर्मिती करण्याची सयंत्रे बसविली आहेत. त्याचबरोबर पाणीबचतीसाठीही त्यांनी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ चा मार्ग अवलंबला आहे. या बालकल्याण संकुलामधील मुलींच्या निरीक्षणगृहाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पावसाचे जमा होणारे पाणी एकत्र करून, चार वेगवेगळ्या पीव्हीसी नलिकांमधून एकत्र करून ते जमिनीत एका हौदात सोडले आहे. त्या हौदाला चार फूट उंचीवर मोठे छिद्र पाडून त्यातून जादा होणारे पाणी शेजारील खड्ड्यात सोडून तेथे ते मुरविले आहे. या पाणी मुरविण्याच्या प्रयोगामुळे येथील ठिकाणी बोअरवेलमधून भरपूर प्रमाणात पाणी मिळते आहे. बालकल्याण संकुलात गच्चीवरील पाण्याने कूपनलिकेचे पुनर्भरणपाणीबचतीचा फंडा : टंचाईवर मात करण्यासाठी 'रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा असाही प्रयोग --लोकमत जलमित्र अभियानकोल्हापूर : पाणी म्हणजे जीवन याचे महत्त्व नागरिकांना पटू लागले आहे. त्यासाठी विविध माध्यमांतून पाणीबचतीच्या संकल्पना पुढे येऊ लागल्या आहेत. इमारतीच्या गच्चीवर जमा होणारे पावसाचे पाणी वाया न घालविता ते एका हौदात साठवून ते रिबोअरसाठी मुरवून वापरले जात आहे. अशा पद्धतीने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा प्रकल्प येथील मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलामध्ये करून त्यांनीही इतर समाजसेवेबरोबरच पाणीबचतीचा नवा मार्ग सांगितला आहे.सध्या महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना पाण्याचे महत्त्व किती, याची जाणीव मानवाला होऊ लागली आहे. ‘पाणी मुरवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना जरी शासनाने आणली असली तरीही शासनाच्या कोणत्याही योजनेची वाट न पाहता आपल्या घरातील सांडपाणी, पावसाचे जमा होणारे पाणी, आदी विविध मार्गांनी उपलब्ध होणारे पाणी जमिनीत मुरविण्याबाबत प्रबोधनाची गरज निर्माण झालेली आहे. सध्या भूगर्भातील पाणीपातळी कमालीची खालावली असताना ज्या भागात पाणी जिरविण्याचे तंत्र पूर्वीपासून अवलंबिले आहे. तेथे मात्र भूगर्भातील पाणीपातळी जादा असल्याचे दिसून आले आहे. कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटनाच्या ‘बालकल्याण संकुल’ मध्येही पाणीबचतीचा मार्ग अवलंबला आहे. याच बालकल्याण संकुलामध्ये यापूर्वी वाया जाणाऱ्या अन्नापासून खतनिर्मिती व बायोगॅस निर्मिती करण्याची सयंत्रे बसविली आहेत. त्याचबरोबर पाणीबचतीसाठीही त्यांनी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ चा मार्ग अवलंबला आहे. या बालकल्याण संकुलामधील मुलींच्या निरीक्षणगृहाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पावसाचे जमा होणारे पाणी एकत्र करून, चार वेगवेगळ्या पीव्हीसी नलिकांमधून एकत्र करून ते जमिनीत एका हौदात सोडले आहे. त्या हौदाला चार फूट उंचीवर मोठे छिद्र पाडून त्यातून जादा होणारे पाणी शेजारील खड्ड्यात सोडून तेथे ते मुरविले आहे. या पाणी मुरविण्याच्या प्रयोगामुळे येथील ठिकाणी बोअरवेलमधून भरपूर प्रमाणात पाणी मिळते आहे. पाणीबचतीचा आदर्शदोन वर्षांपूर्वी संस्थेने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पावसाचे पाणी एकत्र करून ते पुन्हा जमिनीत मुरविण्याचा प्रयोग केला होता; पण आता दुसरा मजला बांधल्यामुळे टेरेसवर हा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबविला आहे. त्याद्वारे कूपनलिकेचे पुनर्भरण करुन पाणीबचतीचा आदर्श जपला आहे.
बालकल्याण संकुलात गच्चीवरील पाण्याने कूपनलिकेचे पुनर्भरण
By admin | Published: May 26, 2016 11:40 PM