कोल्हापूर : केआयटी, आयएमईआर कॉलेजच्या एम. बी. ए. आणि एम. सी. ए. विभागांच्या जिनीबेन या वार्षिक स्नेहसंमेलनाचा दुसरा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या स्नेहसंमेलनाचे मीडिया पार्टनर ‘लोकमत’ होते.केआयटी कॉलेजच्या परिसरातील खुल्या सभागृहात झालेल्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या राज्यांच्या संस्कृतींचे दर्शन घडविले आणि विविध गुणदर्शनाचा हा कार्यक्रम आनंदात पार पडला. म्युझिकल फिशपॉँड आणि फिशपॉँड्सनी विद्यार्थ्यांमध्ये धमाल केली. ‘म्युझिकल हाऊजी’सारख्या स्पर्धांनी विद्यार्थ्यांची उत्कंठा वाढविली. दुसऱ्या दिवशी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केआयटी कॉलेजचे सेक्रेटरी दीपक चौगुले उपस्थित होते. सोबत केआयटी, आयएमईआरचे डायरेक्टर डॉ. एस. एम. खाडिलकर, स्नेहसंमेलनाचे संयोजक डी. बी. देसाई, फिजिकल डायरेक्टर एन. टी. पाटील उपस्थित होते. यावेळी क्रीडा, एमबीए आणि एमसीएमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. एमबीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी प्रतीक पाटील याने ‘खेलो इंडिया’मध्ये फेन्सिंग क्रीडाप्रकारात रजतपदक प्राप्त केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. २०२० चे जनरल चॅम्पियनशिप एमबीए प्रथम वर्षाच्या बी डिव्हिजनने मिळविली. यासाठी चेअरमन भारत पाटील आणि व्हाईस चेअरमन सुनील कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.=========================फोटो ०६०३२०२० कोल केआयटी