कोडोली येथे ‘लोकमत’चे संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं' या उपक्रमांतर्गत लोकमत व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसर यांच्या वतीने बुधवारी आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रोटरीयन व युवा उद्योजक विशाल जाधव म्हणाले, रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरात विविध सामाजिक उपक्रमात सहभागी आहे. या पुढच्या काळातसुद्धा लोकमतसोबत समाजहिताच्या उपक्रमात रोटरी परिवार सहभागी होईल.
यावेळी २६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसराचे अध्यक्ष प्रवीण बजागे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे सेक्रेटरी दिव्यराज वसा, युवा उद्योजक विशाल जाधव, कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद, पीएसआय नरेंद्र पाटील, कोडोलीच्या सरपंच मनीषा पाटील, उपसरपंच निखिल पाटील, कोडोली अर्बन बँकेचे चेअरमन राहुल पाटील, प्रोजेक्ट चेअरमन सुनील पोवार, ट्रेझरर कृष्णात जमदाडे, सदस्य प्रकाश सूर्यवंशी, संदीप रोकडे, पराग गोडबोले, जयदीप पाटील, विशाल बुगले, रसिका डोईजड, सचिन पाटील, भारत कडवेकर, अमर जगताप, अभिजित जाधव, डॉ. श्यामाप्रसाद पावसे, डॉ. अमित सूर्यवंशी सागर पाटील, अविनाश निकम, ‘लोकमत’चे जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी, उपसरव्यवस्थापक (निर्मिती) बाजीराव ढवळे, उपव्यवस्थापक लोकमत कनेक्ट आणि मार्केटिंग दीपक मनाटकर, जाहिरात प्रतिनिधी संभाजी खवरे, सहायक प्रोडक्शन मॅनेजर महेश खामकर, आनंदा वायदंडे, रवींद्र पोवार, संजय पाटील, संतोष मिणचेेकर, धनाजी पाटील, दीपक केकरे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, मोहन पाटील, संजय मेनकर, हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष मानसिंग पाटील, माजी सरपंच नितीन कापरे, वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी जंगम, यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंजूषा खेत्री, राहुल कुलकर्णी, राहुल राजशेखर व शशांक पोवार या सिनेेकलाकारांनी, तर सोमनाथ सूर्यवंशी व कृष्णात शिंदे या अपंग बांधवांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला.
यावेळी युवा नेते विश्वेश कोरे, स्वाभिमानी संघटनेचे संघटक वैभव कांबळे यांच्यासह वारणा परिसरातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. वैभव लक्ष्मी रक्तपेढी, महात्मा गांधी रक्तपेढी, संजीवनी रक्तपेढी यांनी रक्त संकलित केले. प्रमोद मंगसुळे, अनिल सरनोबत, अरुण नरबळ व आदी कर्मचाऱ्यांनी रक्त संकलित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता चव्हाण यांनी केले. आभार सुनील पोवार यांनी मानले.
चौकट :
१०१ वेळा रक्तदान केलेले वसंतराव चव्हाण बहिरेवाडी व ६६ वेळा रक्तदान केलेले सुधीर जाधव व संतोष जंगम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
......................................
फोटो ओळी
कोडोली येथे बुधवारी झालेल्या महारक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, रोटरीचे सेक्रेटरी दिव्यराज वसा, युवा उद्योजक विशाल जाधव, दिनेश काशीद, नरेंद्र पाटील, मनीषा पाटील, निखिल पाटील, राहुल पाटील, श्रीराम जोशी, बाजीराव ढवळे, दीपक मनाटकर, प्रवीण बजागे, सुनील पोवार, ट्रेझरर कृष्णात जमदाडे, प्रकाश सूर्यवंशी, संदीप रोकडे, पराग गोडबोले यांच्यासह रोटरीचे सदस्य व मान्यवर.