प्रकाश पाटील - कोपार्डे -साखरेचे दर घसरल्याने संपूर्ण साखर उद्योगामध्ये आर्थिक चणचण निर्माण झाली असली तरी राज्यात गेल्या दहा वर्षांतील उसाच्या गाळपाचा उच्चांक झाला आहे. ९ कोटी २९ लाख ५४ हजार मे. टन उसाचे गाळप झाले आहे, तर ११.२८च्या सरासरी साखर उताऱ्यासह १० कोटी ४८ लाख २८ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. हंगाम २०१४/१५ चा शेवट १३ जूनला झाला. या हंगामात १७८ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम पार पाडले.साखरेचे दर घसरल्याने राज्यातील साखर कारखान्यांकडे एफआरपीसाठीची ४ हजार कोटींची थकबाकी असताना प्रतिहेक्टर ऊस उत्पादन वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या हंगामात (२०१३/१४) ६ कोटी ७६ लाख ३७ हजार मे. टन उसाचे गाळप झाले, तर साखर उत्पादन ७ कोटी ७१ लाख ९९ हजार क्विंटल झाले. यात उसाच्या गाळपाचा विचार केल्यास २ कोटी ५३ लाख १७ हजार मे. टनाची वाढ झाली असून, साखर उत्पादनात दोन कोटी ७६ लाख २८ हजार क्विंटलने वाढ झाली आहे; मात्र यावर्षी साखर उताऱ्यात किंचितशी म्हणजेच १३ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले. साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सर्वाधिक उतारा कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त दालमिया या खासगी कारखान्याचा आहे. या कारखान्याने १३.३४ ची सरासरी साखर मिळविताना ६ लाख ८३ हजार ९७४ मे. टन उसाचे गाळप करून ९ लाख १२ हजार ३५० क्विंटल साखर उत्पादन केले आहे, तर गाळपात सोलापूर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक १७ लाख ५६ हजार १६ मे. टन उसाचे गाळप केले आहे, तर १९ लाख ५० हजार क्विंटल साखर उत्पादन करून विक्रम केला आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याने १५ लाख १८ हजार १०१ मे. टन उसाचे गाळप करत १८ लाख ९५ हजार ८०० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. राज्यात कोल्हापूर विभागात सर्वाधिक सरासरी १२.५४ टक्के उतारा आहे, तर पुणे विभाग ३८६ लाख ३७ हजार मे. टन उसाचे गाळप करून गाळपात आघाडीवर आहे. हंगाम २०१४/१५ मधील विभागवार गाळप हंगामाची स्थिती (गाळप लाख मे. टन, उत्पादन लाख क्विंटल)विभागऊस गाळपसाखर उत्पादनसाखर उतारा (टक्के)कोल्हापूर२१२.५५२६६.५३१२.५४पुणे३८६.३७४२८.२४११.०८नगर१३०.००१४३.७९११.०६औरंगाबाद७४.२२७५.२२१०.१३नांदेड११६.०८१२३.८७१०.६७अमरावती४.८६५.०११०.३१नागपूर५.४६५.६११०.२७एकूण९२९.५४१०४८.२८११.२८ टक्केगेल्या दहा वर्षांतील राज्यातील उसाच्या गाळपाची स्थिती (गाळप लाख मे. टनांत, उत्पादन मे. टन)वर्षउसाचे साखर उत्पादन साखर उतारा गाळप(मे. टनांत)(टक्के)२०१३/१४६७६.३७७७.२००११.४१२०१२/१३७००.२६७९.८७२११.४१२०११/१२७७०.२५८९.६०११.६३२०१०/११८०२९०.७०११.३१२००९/१०६१४.४७७१.०५११.५६२००८/०९४००.४२४६.१४११.५२२००७/०८७६१.७४९०.९७११.९४२००६/०७७९८.३८९०.९४७११.३९२००५/०६४४५.५७५१.९७६११.६७२००४/०५१९४.५४२२.३१८११.४७
राज्यात ऊस गाळपाचा विक्रम
By admin | Published: June 27, 2015 12:25 AM